Relationship Tips : ब्रेकअप झालेल्या व्यक्तीला चुकूनही 'या' गोष्टी सांगू नका

Breakup : ब्रेकअपमधून जाणाऱ्या व्यक्तीला जे झालं ते चांगलं झालं असं कधीच म्हणू नका. त्यापेक्षा त्या व्यक्तीची आठवण न येण्यासाठी वेगवेळ्या फंक्शनमध्ये जा.
Relationship Tips
Relationship TipsSaam TV
Published On

ब्रेकअप, घटस्फोट यांचं प्रमाण सध्या मोठ्याप्रमाणावर वाढलं आहे. रिलेशनशीप आणि वैवाहिक जीवनात आजही अनेक व्यक्ती दु:खी आहेत. एकमेकांवर प्रेम असूनही इगो, अॅटीट्युड आणि तत्व अशा गोष्टींमुळे नाती तुटतात. आता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील कुणाचा ब्रेकअप झाला असेल तर त्या व्यक्तीशी तुम्ही काही गोष्टी बोलणे टाळले पाहिजे.

Relationship Tips
Viral Video: प्रेम करावं तर असं...ब्रेकअप झाला, तरुणानं एक्स गर्लफ्रेंडच्या नावानं उघडलं पाणीपुरीचं दुकान

विसरून जाणे

ब्रेकअप झालेली व्यक्ती आधीच दु:खात असते. अशावेळी आपल्या पार्टनरच्या चांगल्या आठवणी त्यांच्या मनात कायम असतात. दु:खात असताना सुद्धा पार्टनरला विसरून जा असं सांगणे चूक आहे. त्यापेक्षा त्या व्यक्तीची तुमच्या फ्रेंडला कशी आठवण येणार नाही यासाठी तुम्ही काय केले पाहिजे याचा विचार करा.

तो वाईटच होता

ब्रेकअप झाल्यानंतर तुमच्या फ्रेंडला तो व्यक्ती वाईट होता असं अजिबात सांगू नका. गोष्टी पटत नसल्याने ते वेगळे झालेले असतात. जेव्हा आपण तो वाईटच होता, मलाही तो कधीच आवडला नाही, आवडली नाही असं आपल्या मैत्रिणीला किंवा मित्राला सांगतो तेव्हा आपण खुप मोठी चूक केली अशा भावना त्याच्या मनात येतात.

जे झालं ते चांगलंच झालं

ब्रेकअपमधून जाणाऱ्या व्यक्तीला जे झालं ते चांगलं झालं असं कधीच म्हणू नका. त्यापेक्षा त्या व्यक्तीची आठवण न येण्यासाठी वेगवेळ्या फंक्शनमध्ये जा. ब्रेकअप झाल्यानंतर त्या व्यक्तीचा किंवा नात्यासंबंधीत गोष्टींविषयी संवाद साधू नका.

तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचं ब्रेकअप झालं असेल तर त्या व्यक्तीला बाहेर फिरण्यासाठी घेऊन जा. तसेच त्यांना सतत विविध कामांमध्ये व्यस्त ठेवा. त्या व्यक्तीला आवडणारे विविध पदार्थ खाण्यासाठी द्या, अशा काही टिप्सने ब्रेकअप झालेल्या व्यक्तीचं माइंड डायव्हर्ड होण्यास मदत होईल. कारण कोणी कितीही सहानुभूती दाखवली तरी त्या व्यक्तीला स्वत: या दु:खातून बाहेर यावे लागते.

Relationship Tips
Relationship Tips : ब्रेकअप करण्यापूर्वी या ५ गोष्टी लक्षात ठेवा, नात्यातील दूरावा होईल कमी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com