Rohini Gudaghe
ताप आल्यावर आपण अनेकदा औषधं घेतो. त्याऐवजी काही नैसर्गिक घरगुती उपाय आज आपण जाणून घेऊ या.
मधात बुडवलेला आल्याचा तुकडा चघळल्यामुळे नैसर्गिकरित्या तापाशी सामना केला जाऊ शकतो.
हळदीमुळे ताप, कफ, घशातील खवखव कमी होते.
ग्लासभर गरम दूधात हळद मिसळून प्यायल्याने तापापासून आराम मिळतो.
तुळशीची पानं चघळल्यामुळे ताप कमी होण्यास मदत होते.
लसूण देखील तापावर प्रभावी उपाय आहे. लसणाच्या पाकळ्या चघळल्यास ताप कमी होण्यास मदत होते.
प्रथमोपचार म्हणून ताप आल्यावर त्वरित कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, त्यामुळे ताप कमी होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.