Shraddha Thik
त्वचा चमकदार ठेवण्यासाठी आपण मार्केटमध्ये मिळणारे महागडे प्रोडक्ट्स वापरतो. त्यामधील केमिकल्समुळे चेहऱ्याचे अधिक नुकसान होऊ शकते.
तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक गोष्टींचा वापर केल्यास नुकसान होत नाही, चेहऱ्यावरील सौंदर्य खुलवण्यासाठी वापरा या घरगुती टीप्स.
बेसन आणि हळद यांना एकत्र करून मिश्रन चेहऱ्यावर लावा हळदीमध्ये अँटिऑक्सिडेंट्स आणि बेसन चेहऱ्याला एक्सफोलिएट करण्यास मदत करते.
चंदन पावडर आणि गुलाब पाणी एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यावर पिंपल आणि रॅश कमी करण्यास मदत करते.
बदाम आणि कच्च दुध एकत्र करुन लावल्यास चेहऱ्यावरील डर्ट निघून तो मऊ बनवते. दुधामधील क्लिंझिंग प्रॉपर्टी त्वचेसाठी लाभदायक ठरतात.
बटाटा मिक्सरमध्ये वाटा त्यामध्ये थोडा लिंबाचा रस घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास पिंपलही कमी होतात.
पपईचा गर चेहऱ्यावर लावा आणि सुकेपर्यंत तसेच राहू द्या. यामुळे चेहरा चमकदार होण्यास मदत होते.