Monsoon Tourism SAAM TV
लाईफस्टाईल

Monsoon Tourism : रिमझिम पावसाच्या सरी अन् थंडगार वारा; मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहेत 'हे' निसर्गरम्य पिकनिक स्पॉट

Monsoon Picnic Spot Near Mumbai : मुंबईजवळ निसर्गरम्य मान्सून पिकनिक स्पॉट आहेत. वीकेंडला आपल्या कुटुंबासोबत आवर्जून भेट द्या आणि निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवा. ठिकाणांची यादी आताच नोट करा.

Shreya Maskar

पावसाळा येताच आपण फिरण्याचे प्लान करायला सुरूवात करतो. तुम्हालाही पावसाळ्यात मनसोक्त फिरायचे असेल तर लांब कशाला? मुंबईजवळच भन्नाट पिकनिक स्पॉट वसलेले आहेत. येथे तुम्ही कुटुंब, मित्र आणि जोडीदार कोणासोबतही निवांत वेळ घालवू शकता. तसचे हे निसर्गरम्य मान्सून स्पॉट बजेट फ्रेंडली (Monsoon Picnic Spot Near Mumbai ) आहेत. अशाच सुंदर ठिकाणांची यादी नोट करा.

माळशेज घाट

माळशेज घाट पुणे जिल्ह्यात येतो. माळशेज घाटात निसर्गाचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो. माळशेज घाटच्या जवळ धबधबे, किल्ले पाहायला मिळतात. तुम्ही येथे सुंदर फोटोशूट देखील करू शकता. माळशेज घाट ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे.

पाचगणी

साताऱ्या जिल्ह्यात पाचगणी हिल स्टेशन आहे. येथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत छान हनिमून प्लान करू शकता. पाचगणीला आल्यावर मॅप्रो गार्डनर, कास पठार या ठिकाणांना भेट द्या. पावसाळ्यात येथे थंड वातावरण अनुभवायला मिळते.

कोलाड

कोलाड हे ठिकाण रिव्हर राफ्टिंगसाठी बेस्ट आहे. कोलाड रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे. कोलाड येथे तुम्ही सुंदरप्री-वेडिंग शूट करू शकता. मित्रांसोबत तुफान मजा-मस्ती करण्यासाठी हे बेस्ट लोकेशन आहे.

जव्हार

पालघर तालुक्यात जव्हार हे ठिकाण येते. तुम्ही येथे पावसाळ्यात आवर्जून भेट द्या. जव्हारला गेल्यावर काळमांडवी धबधबा, हिरडपाडा धबधबाला आवर्जून भेट द्या.

लोणावळा तलाव

लोणावळा तलाव हे परदेशी पर्यटकांचे देखील आकर्षण आहे. येथे तुम्ही जोडीदारासोबत निवांत वेळ घालवू शकता. लोणावळा तलाव पुणे जिल्ह्याच्या जवळ वसलेला आहे. लोणावळा तलावला पावसाळ्यात आवर्जून भेट द्या.

ड्यूक नोज

ड्यूक नोज हे ट्रेकिंगसाठी बेस्ट ठिकाण आहे. लोणावळाजवळ ड्यूक नोज हे ठिकाण आहे. येथे तुम्ही रॉक क्लाइंबिंग, कॅम्पिंगचा देखील आनंद घेऊ शकता. मित्रांसोबत येथे आवर्जून जा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

Crime News: पुण्यात टोळी युद्धाचा भडका, आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉरला सुरुवात

Asia Cup Hockey 2025 : टीम इंडियाने चौथ्यांदा कोरलं आशिया कपवर नाव; अंतिम फेरीत दक्षिण कोरियाला धूळ चारली

SCROLL FOR NEXT