Konkan Tourism SAAM TV
लाईफस्टाईल

Konkan Tourism : मे महिन्याची सुट्टी अन् कोकणची ट्रिप; सावंतवाडीत लपलंय अद्भुत निसर्ग सौंदर्य

Famous Places In Sawantwadi : कोकणात मे महिन्याची ट्रिप प्लान करत असाल तर सावंतवाडीला आवर्जून भेट द्या. येथे तुम्हाला अनेक ठिकाणे फिरता येतील. पर्यटन स्थळांची यादी आताच नोट करा.

Shreya Maskar

सावंतवाडी कोकणाची शान आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा एक तालुका आहे. सावंतवाडी पश्चिम महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळ वसलेले आहे. सावंतवाडीला गेल्यावर तुम्हाला अनेक पिकनिक स्पॉट पाहायला मिळतील. निसर्ग सौंदर्याने सावंतवाडी नटलेली आहे. यात मोती तलाव, नरेंद डोंगर, हनुमान मंदिर, सावंतवाडी पॅलेस आणि शिल्पग्राम यांसारखी पर्यटन स्थळांचा समावेश आहे. मे महिन्याच्या सुट्टीत लाँग ट्रिप प्लान करत असाल तर सावंतवाडील टॉप ४ ठिकाणांना आवर्जून भेट द्या.

मोती तलाव

सावंतवाडीतील मोती तलाव पर्यटकांचे आकर्षण आहे. सावंतवाडीला आल्यावर मोती तलावला आवर्जून भेट द्या. उन्हाळ्यात येथे तुम्हाला थंड वातावरण अनुभवता येते. मोती तलावाकाठी बसून तुम्ही एक निवांत संध्याकाळ घालवू शकता. जोडीदारासोबत फेरफटका मारण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. सूर्यास्ताचा अद्भुत नजारा येथे पाहायला मिळतो.

आंबोली

आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यात येते. कोकणातील हे सर्वात सुंदर ठिकाण आहे. आंबोली घाट समुद्रसपाटीपासून अंदाजे 700 मीटर उंचीवर आहे. येथे तुम्हाला डोंगर, दऱ्यांचा सुरेख नजारा पाहायला मिळेल. आंबोली धबधबा देखील पर्यटकांचे आकर्षण आहे. येथे तुम्ही भन्नाट फोटोशूटचा आनंद घेऊ शकता. तुम्ही मित्रांसोबत ट्रेकिंगचा प्लान देखील करू शकता. आंबोलीला गेल्यावर येथील कावळा शेत आणि महादेव गड पॉइंटला आवर्जून भेट द्या. येथे तुम्हाला निसर्गाचे अद्भुत रूप अनुभवता येईल.

सावंतवाडी पॅलेस

सावंतवाडीला ऐतिहासिक वारसा देखील लाभला आहे. सावंतवाडीला गेल्यावर सावंतवाडी पॅलेसला आवर्जून भेट द्या. डोंगराच्या माथ्यावर सावंतवाडी पॅलेस वसलेला आहे. येथे तुम्हाल फिरवळ पाहायला मिळेल. सावंतवाडी पॅलेस वास्तुकलेचा उत्तम नजारा आहे.

नरेंद्र डोंगर उद्यान

नरेंद्र डोंगर उद्यान घनदाट जंगलांनी वेढलेले आहे. नरेंद्र डोंगरावरून तुम्हाला शहराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. येथे तुम्ही ट्रेकिंगचा प्लान देखील करू शकता. लहान मुलांसोबत येथे आवर्जून भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : तरुणीने डेटिंग ॲपवरून ओळख केली; हॉटेलमध्ये एकटं बोलावलं अन्...; बोरिवलीतील तरुणासोबत घडला भयंकर प्रकार

Maharashtra Live News Update : नाशिकच्या इगतपुरीत दरड कोसळली, आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटला

Nashik Crime News: नाशिकमध्ये चड्डी गँगचा कहर; घरात घुसून ४ तोळे सोनं लंपास| VIDEO

Israel : इराणनंतर इस्रायलचा येमेनवर हल्ला, येमेनची 3 प्रमुख बंदरं उद्ध्वस्त

Fact Check: पेट्रोल 45 रूपये लिटर होणार? सरकार पेट्रोलचे दर कमी करणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT