Kurdai Recipe : कुरकरीत कुरडई कशी बनवाल? वाचा पारंपरिक रेसिपी, पहिल्याच प्रयत्नात पदार्थ बनेल स्वादिष्ट

Rava Kurdai Traditional Recipe : उन्हाळ्यात आवर्जून रव्याची कुरडई बनवा. हा पदार्थ चवीला उत्तम लागतो. उन्हाळ्यात हा पदार्थ आवर्जून खाल्ला जातो. आताच रेसिपीची पारंपरिक पद्धत जाणून घेऊयात.
Rava Kurdai Traditional Recipe
Kurdai RecipeSAAM TV
Published On

मे महिना म्हटला की, मामाचे गाव आलं. तुफान मजा-मस्ती आणि भन्नाट जेवणाचा बेत येथे आखला जातो. महिनाभराची मस्त ट्रिप गावाला प्लान केली जाते. फिरण्यासोबत अनेक पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. उन्हाळ्यात गावाला प्रामुख्याने घरोघरी वाळवणाचे पदार्थ केले जातात. ज्यात कुरडई, पापड यांचा समावेश असतो. हे पदार्थ खायला एकदम स्वादिष्ट लागतात मात्र हे पदार्थ बनवायला खूप मेहनत लागते. आज आपण असाच एक पदार्थ बनवायला शिकणार आहोत. रव्याची कुरडई (Rava Kurdai Traditional Recipe ) कशी बनवावी जाणून घेऊयात.

रव्याची कुरडई

साहित्य

कृती

रव्याची इन्स्टंट कुरडई बनवण्यासाठी एक बाऊलमध्ये रवा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर यात पाणी टाकून ५ मिनिटे तसेच ठेवा. असे किमान 3-4 दिवस रवा स्वच्छ धुवून त्यातील पाणी काढायचे आहे. तसेच दिवसातून ३ ते ४ वेळा रव्यातील पाणी बदलावे. काही दिवसांनी त्यात चीक तयार होतो. ज्याच्यापासून कुरडई बनते.

Rava Kurdai Traditional Recipe
Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकर यांनी बनवला कोकणी पदार्थ; चटपटीत 'काजूच्या बोंडूचं भरीत', नोट करा पारंपरिक रेसिपी

आता हा चीक एका बाऊलमध्ये टाकून त्यात पाणी ओता. तसेच या मिश्रणात चवीनुसार मीठ आणि भाजलेले जिरे टाका. हे मिश्रण चांगले फेटून पॅनमध्ये व्यवस्थित शिजवून घ्या. त्यानंतर हा चीक पांढऱ्या स्वच्छ कपड्यात ओतून कुकरला शिजवून घ्यावा. मिश्रण थंड झाल्यावर कुरडई बनवण्याच्या पात्रात हे मिश्रण ओतून त्यात एका प्लास्टिक पेपरवर कुरडई पाडून घ्याव्यात. ५ ते ६ दिवस उन्हात आणि पंख्याखाली कुरडई सुकवा. खाण्याच्या वेळी कुरडई तेलात खरपूस तळून घ्या. कुरकुरीत कुरडई तयार झाली.

उन्हाळ्यात रवा खाण्याचे फायदे

  • रव्यात पोषक घटकांचा खजिना आहे. यात फायबर, जीवनसत्त्वे आणि प्रथिने मोठ्या प्रमाणात आढळतात.

  • वजन कमी करण्यासाठी रवा मदत करतो. रवा खाल्ल्याने भूक कमी लागते.

  • उन्हाळ्यात पचायला हलके पदार्थ खाण गरजेचे असते. रवा पचायला सोपा असतो. त्यामुळे उन्हाळ्यातील पचनसंस्थेच्या समस्या दूर होतात.

  • रवा खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

  • रवा शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत करण्यास मदत करतो.

Rava Kurdai Traditional Recipe
South Indian Aloo Kurma Recipe: घरच्या घरी साऊथ स्टाईल आलू कुरमा कसा बनवायचा? जाणून घ्या सोपी रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com