Shruti Vilas Kadam
उन्हात राहिल्यानंतर लगेचच पाणी पिणे टाळा. सर्वप्रथम घरात येऊन १०-१५ मिनिटे विश्रांती घ्या आणि शरीराचे तापमान सामान्य होऊ द्या. यानंतरच पाणी पिणे योग्य ठरेल.
उन्हातून आल्यावर थंड किंवा बर्फाचे पाणी पिणे टाळा. अचानक थंड पाणी पिल्यास सर्दी, खोकला, ताप किंवा पाचनतंत्राशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी कोमट पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे. हे पाणी शरीरात सहजपणे शोषले जाते आणि पचनक्रिया सुधारते.
उन्हातून आल्यावर एकदम भरपूर पाणी पिण्याऐवजी, थोड्या थोड्या अंतराने पाणी प्या. हे शरीराला आवश्यकतेनुसार पाणी शोषण्यास मदत करते.
उन्हाळ्यात दररोज पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. सामान्यतः पुरुषांनी दररोज सुमारे ३.७ लिटर आणि महिलांनी सुमारे २.७ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.
घामामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता होऊ शकते. त्यामुळे नारळपाणी, लिंबूपाणी किंवा इलेक्ट्रोलाइट्सयुक्त पेये पिणे उपयुक्त ठरते.
पाणीशिवाय, जलयुक्त फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा. उदा., कलिंगड, काकडी, संत्री, स्ट्रॉबेरी इत्यादी. हे अन्नपदार्थ शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.
( सादर माहिती प्राथमिक असून अधिक माहितीसाठी डॉटरांचा सल्ला द्या)