Shruti Kadam
जर कुटुंबातील इतर महिलांना ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल, तर अनुवांशिक कारणांमुळे इतर महिलांनाही याचा धोका वाढतो.
वय वाढल्याने ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता वाढते, विशेषतः 55 वर्षांनंतर.
एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन या हार्मोन्सचे वाढलेले प्रमाण ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढवू शकते.
धूम्रपान आणि मद्यपान या सवयी ब्रेस्ट कॅन्सरच्या जोखमीला अधिक वाढवतात.
जास्त वजनामुळे शरीरात हार्मोनल बदल होतात, जे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढवू शकतात.
नियमित व्यायामाचा अभाव हा ब्रेस्ट कॅन्सरच्या जोखमीचा एक घटक आहे.
अयोग्य आहार आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू शकतो.