Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकर यांनी बनवला कोकणी पदार्थ; चटपटीत 'काजूच्या बोंडूचं भरीत', नोट करा पारंपरिक रेसिपी

Aishwarya Narkar Recipe Video : मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी काजूपासून कोकणातील पारंपरिक पदार्थ 'काजूच्या बोंडूचं भरीत' बनवल आहे. ज्याची रेसिपी त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
Aishwarya Narkar Recipe Video
Aishwarya NarkarSAAM TV
Published On

मालिकांमधून आपली स्वतःची विशेष ओळख बनवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) कायमच सोशल मीडियावर सक्रिय दिसतात. वेगवेगळ्या रील ते कायम पोस्ट करत राहतात. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी आजवर अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटात काम केले आहे. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्या कोकणात गेल्याचे दिसत आहे. कोकणाच्या (Konkan) मातीत त्यांनी चविष्ट पदार्थ बनवला आहे.

मे महिन्याची चाहूल लागताच सर्वजण कोकणाकडे धाव घेतात. उन्हाळ्यात कोकणात बनवले जाणारे पदार्थ खूप चवदार आणि प्रसिद्ध असतात. मे महिना हा आंबे, फणस आणि काजूंचा असतो. यात ऐश्वर्या नारकरांनी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओतून चाहत्यांना 'काजूच्या बोंडूचं भरीत' कसे बनवावे, याची रेसिपी सांगितली आहे.

'काजूच्या बोंडूचं भरीत' रेसिपी

'काजूच्या बोंडूचं भरीत' (Cashew Recipe) बनवण्यासाठी सर्वप्रथम काजूच्या बोंडांचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवून घ्या. एका बाऊलमध्ये काजूच्या बोंडांचे तुकडे मॅश करून घ्या. यात मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून मिक्स करा. त्यानंतर थोडे दही सुद्धा घाला. चवीनुसार मीठ आणि साखर घालून मिश्रण एकजीव करा. आता पॅनमध्ये तूप आणि हिंग टाकून फोडणी तयार करा. जी काजूच्या बोंडाच्या मिश्रणावर टाका. अशाप्रकारे 'काजूच्या बोंडूचं भरीत' तयार झाले आहे.

ऐश्वर्या नारकरांनी यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पाककौशल्याचे कौतुक होताना पाहायला मिळत आहे. काजू ही कोकणाची शान आहे. काजूपासून अनेक पदार्थ बनवले जातात. चाहते आता ऐश्वर्या नारकर यांच्या आगामी प्रोजक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Aishwarya Narkar Recipe Video
kartiki Gaikwad : गायिका कार्तिकी गायकवाडच्या लेकाची पहिली झलक पाहिलीत का? अंगाई गात नावही सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com