kartiki Gaikwad : गायिका कार्तिकी गायकवाडच्या लेकाची पहिली झलक पाहिलीत का? अंगाई गात नावही सांगितलं

kartiki Gaikwad Revealed Baby Boy Face And Name : गायिका कार्तिकी गायकवाडने आपल्या बाळाची पहिली झलक दाखवली आहे. तसेच तिने बाळाचे नाव देखील सांगितले आहे.
kartiki Gaikwad Revealed Baby Boy Face And Name
kartiki Gaikwad SAAM TV
Published On

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' मधून घरोघरात पोहचलेली कार्तिकी गायकवाड (kartiki Gaikwad) कायम तिच्या सुरेल आवाजासाठी ओळखली जाते. आजवर तिने खूप सुंदर गाणी गायली आहेत. तिच्या आवाजाचे चाहते दिवाने आहेत. 2024 मध्ये कार्तिकीने गोंडस बाळाला जन्म दिला होता. आता 2025 मध्ये कार्तिकीने आपल्या बाळाची पहिली झलक दाखवली आहे.

कार्तिकीने खास युट्यूब व्हिडीओ शेअर करून आपल्या बाळाची पहिली झलक दाखवली आहे. तसेच त्याचे नाव देखील सांगितले आहे. कार्तिकीने बाळाच्या खास व्हिडीओची लिंक इन्स्टाग्राम स्टोरीला टाकून त्याला हटके कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "अखेर प्रतीक्षा संपली…अंगाई आणि बाळाचा चेहरा रिव्हिल केला आहे" व्हिडीओमध्ये कार्तिकी बाळाला अंगाई गात झोपताना दिसत आहे. तसेच कार्तिकीचा नवरा रोनित पिसे देखील बाळासोबत खेळताना दिसत आहे.

कार्तिकी गायकवाडचे 'अंगाई-नीज बाळा' गाणे प्रदर्शित झाले आहे. कार्तिकी आणि रोनित पिसेने 2020 साली लग्नगाठ बांधली. कार्तिकी गायकवाडच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. कार्तिकीने तिच्या मुलाचे नाव रिशांक असं ठेवलं आहे.

व्हिडीओमध्ये कार्तिकी पांढऱ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. तर तिच्या लेकाने देखील क्यूट सूट परिधान केला आहे. तिघे देखील व्हिडीओत खूप आनंदी दिसत आहे. व्हिडीओमध्ये कार्तिकीचा लेक दुडूदुडू धावताना तर कार्तिकीच्या मांडीवर शांत निजलेला पाहायला मिळत आहे. आता लवकरच रिशांक 1 वर्षाचा होणार आहे.

kartiki Gaikwad Revealed Baby Boy Face And Name
Gauahar Khan : बेबी बंप फ्लॉन्ट करत गौहर खानचा रॅम्प वॉक; हाय हिल्सनं वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com