Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव

Mumbai Crime News : मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाचं अपहरण झालं. विक्रीच्या उद्देशाने बाळ चोरी केल्याचे तपासात समोर आलंय. पोलिसांनी असा डाव उधळला. वाचा
mumbai crime
mumbai Saam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईच्या वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अवघ्या 38 दिवसांच्या लहान बाळाचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बाळाची विक्री करण्याच्या उद्देशाने हे अपहरण करण्यात आले असल्याचे समजते. बाळाचे अपहरण करणाऱ्या चार जणांच्या टोळीचा वनराई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बाळाला सुरक्षित आणि सुखरूपपणे त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले आहे.

अपहरण झालेल्या बालकाचा शोध घेण्यासाठी परिमंडळ 12 च्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा टीम तैनात करण्यात आल्या. सहा दिवस अहोरात्र मेहनत करत तब्बल 11000 रिक्षा चालक आणि एक लाखाहून अधिक मोबाईल नंबर तसेच हजारो सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात वनराई पोलिसांना यश मिळाले. पोलिसांनी मुंबईच्या मालवणी मालाड परिसरातून चारही आरोपींना अटक केली. सध्या आरोपी हे वनराई पोलिसांच्या ताब्यात असून या आरोपींनी यापूर्वी मुंबईत अशाप्रकारे कुठे लहान मुलांची चोरी करून विक्री केली आहे का, याबाबत वनराई पोलीस अधिक तपास करत आहे

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार,सुरेश सलाट व त्यांची पत्नी सोनी सलाट हे जोडपे आपल्या तीन लहान मुलांसोबत गुजरात येथून मुंबईत दोन मार्च रोजी चादरी विक्रीकरीता आले होते. दिवसभर वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोरेगाव परिसरात त्यांनी सादरी विकल्या आणि रात्रीच्या वेळी त्यांना वसईला जाण्याकरीता त्यांना रेल्वे न मिळाल्याने ते फुटपाथवर झोपले.त्याच दरम्यान त्यांचा 38 दिवसाचा मुलगा पहाटे सर्व कुटुंबीय गाढ झोपले असताना अज्ञात व्यक्तीने पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरी (अपहरण) करून घेऊन गेले. मात्र झोपेतून उठल्यानंतर त्यांचा सर्वात लहान मुलगा गायब असल्याचे समजतात त्यांनी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

mumbai crime
Shocking Crime: तृतीयपंथीयांचं गुरू होण्यासाठी गुप्तांग कापलं, किन्नर प्रमुखाला धाडायचं होतं जेलमध्ये पण..

आई-वडिलांच्या तक्रारीवरून वनराई पोलिसांनी कलम १३७ (२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करून घेतला. परिमंडळ 12 चे पोलीस उपायुक्त स्मिता पाटील व दत्तात्रय ढोले, सहाय्यक पोलीस आयुषव दिंडोशी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु माने यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या लहान मुलाचा शोधासाठी पोलिसांची सहा पथके तयार केली.

याचदरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये अंगात एका व्यक्ताने हुडी घातली असल्याचे दिसून आले. यानंतर वनराई पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये दिसणारी पिवळ्या रंगाच्या रिक्षाचा नंबरही स्पष्ट दिसत नव्हता. यामुळे पोलिसांनी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील सर्व पिवळ्या रंगाच्या मागील दोन वर्षात आलेल्या रिक्षांचा शोध घेतला. त्यासोबतच पोलिसांनी एक लाख पेक्षा अधिक मोबाईल नंबरधारकांची तपासणी करत आरोपी मालाड मालवणी परिसरातून शोधून काढला.

mumbai crime
Washim Crime: झटपट श्रीमंत होण्यासाठी तरुणांनी केलं कांड, १० वाहनं चोरली; कारनामे ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

सलग सहा दिवस वनराई पोलिसांच्या सहा टीमने अहोरात्र मेहनत घेत सापळा रचून आरोपी राजू मोरे आणि मंगल मोरे यांच्या घरावर पाळत ठेवून नऊ तारखेला रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आरोपींना अटक केली. आरोपींच्या घरी तो लहान मुलगा आढळून आला, त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करून सुखरूप असल्याची खात्री झाल्यानंतर वनराई पोलिसांच्या तपास पथकाने ते बाळ आपल्या मूळ आई-वडिलांच्या ताब्यात दिले.

mumbai crime
Crime News: संरक्षण भिंतीवरुन विद्यार्थिनींच्या हॉस्टेलमध्ये घुसला, नशेत फुल्ल असताना नराधमाकडून मुलींची छेड; दारुड्याला बेदम चोप

याप्रकरणी वनराई पोलिसांनी मुख्य आरोपी राजू मोरे, मंगल मोरे, फातिमा जिलानी शेख, आणि मोहम्मद आसिफ मोहम्मद उमर खान यांना विक्रीसाठी लहान मुलाच्या चोरी करणे प्रकरणे अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 13 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींनी यापूर्वी कधी लहान मुलाची चोरी करून विक्री केली आहे का? किंवा लहान मुलं चोरी करणाऱ्या टोळीच्या हे लोक संपर्कात आहेत का, यासंदर्भात वनराई पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com