Washim Crime: झटपट श्रीमंत होण्यासाठी तरुणांनी केलं कांड, १० वाहनं चोरली; कारनामे ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Washim Police: वाशिममध्ये ४ अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्हेगारांनी झटपट श्रीमंत होण्यासाठी जेसीबीसह १० वाहनांची चोरी केली होती. या घटनेचा तपास वाशिम पोलिस करत आहेत.
Washim Crime: झटपट श्रीमंत होण्यासाठी तरुणांनी केलं कांड, १० वाहनं चोरली; कारनामे ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
Washim Crime News Saam Tv
Published On

मनोज जैस्वाल, वाशिम

वाशिममध्ये झटपट श्रीमंत होण्यासाठी तरुण चोरी करत होते. श्रीमंत होण्याच्या नादात तरुणांनी ७ दुचाकी, २ ट्रॅक्टर आणि १ जेसीबीची चोरी केली होती. या ४ अट्टल गुन्हेगाराच्या टोळीला वाशिम शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या चोरांकडून पोलिसांनी ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या वाशिम पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

झटपट श्रीमंत होण्याच्या नादात ४ तरुणांनी आधी जेसीबी चोरला असं करत त्यांनी एकापाठोपाठ तब्बल १० वाहनं चोरली. श्रीमंत होण्यासाठी ४ तरुणांनी हा चोरीचा मार्ग स्वीकारला. आधी तरुणांनी जेसीबी चोरी करून नदीतून रेती काढण्याचे काम सुरू केले. त्यानंतर रेती वाहतूक करण्यासाठी २ ट्रॅक्टर चोरी केले. त्यानंतर या ट्रॅक्टरला डिझेल पुरवण्यासाठी एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ७ दुचाकी चोरांनी लंपास केल्या.

Washim Crime: झटपट श्रीमंत होण्यासाठी तरुणांनी केलं कांड, १० वाहनं चोरली; कारनामे ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
Beed Crime : धसांच्या नंतर संदीप क्षीरसागर अडचणीत? तहसीलदाराला धमकावलं, 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल

चोरीच्या घटनांचा तपास करत असताना गुन्हेगारांची ही टोळी वाशिम पोलिसांच्या हाती लागली. या टोळीकडून पोलिसांनी तब्बल ४० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल वाशिम शहर पोलिसांनी जप्त केला आहे. वाशिम जिल्ह्यातील दोन दुचाकी आणि दोन ट्रॅक्टरचा शोध घेत असताना ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. चारही गुन्हेगारांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी तरुण यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील आहेत.

Washim Crime: झटपट श्रीमंत होण्यासाठी तरुणांनी केलं कांड, १० वाहनं चोरली; कारनामे ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
Crime News: रक्षकच बनला भक्षक! पोलीस कॉन्स्टेबलचा गर्भवती महिलेवर बलात्कार; ३ वर्षीय मुलासमोरचं केलं कृत्य

सुखदेव ऊर्फ संचीत गायकवाड (वय २८ वर्षे), नामदेव उत्तम गायकवाड, ज्ञानेश्वर बंडु कछवे, महादेव बबन पाटील या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. यामधील सुखदेव आणि नामदेव हे यवतमाळच्या महागांव तालुक्यातील करंजी गावात राहणारे आहेत. तर ज्ञानेश्वर हा वाशिम जिल्ह्यातल्या ब्राम्हणवाडा येथे राहणारा आहे. तर महादेव पाटील वाशिम येथील हॅपी फेसेस शाळेजवळ राहणारा आहे. वाशिम शहर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

Washim Crime: झटपट श्रीमंत होण्यासाठी तरुणांनी केलं कांड, १० वाहनं चोरली; कारनामे ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
Crime News: बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलताना पाहिलं, संतापलेल्या आईने पोटच्या मुलीला संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com