Crime News: संरक्षण भिंतीवरुन विद्यार्थिनींच्या हॉस्टेलमध्ये घुसला, नशेत फुल्ल असताना नराधमाकडून मुलींची छेड; दारुड्याला बेदम चोप

Drunk Man Trespasses Girls' Hostel in Jalna: जालना येथे एक धक्कादायक घटना घडली असून पुन्हा एकदा मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
jalna news
jalna news Saam Tv
Published On

जालना: जालन्यातील परतूर येथील कस्तुरबा गांधी बालिका वसतीगृहात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, मुलींची छेड काढणाऱ्या दारुड्याला विद्यार्थिनींनी आणि सुरक्षारक्षकाने चांगलाच चोप दिला. ही घटना काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली असून संपूर्ण प्रकरण सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

jalna news
Pune Crime : अनैतिक संबंधात अडसर; प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, मृतदेह पोत्यात घालून दुचाकीने नेलं अन्..

संशयित आरोपीने संरक्षण भिंतीवर चढून वस्तीगृहात प्रवेश केला आणि विद्यार्थिनींना त्रास देण्याचा प्रयत्न केला. मात्र, धाडसी विद्यार्थिनींनी आरोपीला चांगलाच चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले.

या घटनेनंतर परतूरमधील वस्तीगृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर, परतूरच्या तहसीलदारांनी आज वस्तीगृहाला भेट देत सुरक्षेचा आढावा घेतला.

jalna news
Beed News: आधी लग्नाचं आमिष, नंतर अश्लील फोटोंची धमकी, बीडमध्ये विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार

स्थानिक प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com