Gauahar Khan : बेबी बंप फ्लॉन्ट करत गौहर खानचा रॅम्प वॉक; हाय हिल्सनं वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले...

Pregnant Gauahar Khan Ramp Walk : गौहर खान लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. अशात तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात ती हाय हिल्स घालून रॅम्प वॉक करताना दिसत आहे.
Pregnant Gauahar Khan Ramp Walk
Gauahar Khan SAAM TV
Published On

'बिग बॉस' फेम गौहर खान (Gauahar Khan) लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. गौहर खानने आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ती आपल्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करते. तसेच आपल्या कामाचे आणि वैयक्तिक आयुष्याचे अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करते.

आता गौहर खान एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने प्रेग्नन्सीमध्ये भन्नाट रॅम्प वॉक केला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गौहर खानने एका फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला आहे. रॅम्प वॉकसाठी गौहरने इंडोवेस्टर्न लूक केला आहे. तिने सुंदर साडी परिधान केली आहे. ती रॅम्प वॉक करत बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गौहरच्या लूकचे सर्वत्र कौतुक होत असताना तिला एका बाजूने ट्रोल देखील करण्यात आले आहे. गौहर खानने प्रेग्नन्सीमध्ये उंच टाचांच्या हील्स घालून रॅम्प वॉक केला आहे. रॅम्प वॉक करताना तिचा आत्मविश्वास तिच्या डोळ्यात दिसत आहे. गौहर खानच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काही नेटकरी तिच्या रॅम्प वॉक आणि आत्मविश्वासाचे कौतुक करत आहेत. तर काही युजर तिला हाय हिल्समुळे ट्रोल करत आहेत.

गौहर खानने जैद दरबारसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांचा 2020मध्ये शाही विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर गौहर खान 2023मध्ये आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला आणि आता 2025 ला तिने दुसरी प्रेग्नंन्सी जाहीर केली आहे.

Pregnant Gauahar Khan Ramp Walk
Pawan Kalyan Wife : पवन कल्याण यांच्या पत्नीने पूर्ण केला नवस, तिरुमला मंदिरात केले 'मुंडन संस्कार'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com