Sonam Kapoor : रॅम्प वॉक करताना सोनम कपूर ढसाढसा रडू लागली, 'त्या' वेळी नेमकं काय झालं? पाहा VIDEO

Sonam Kapoor Breaks Down In Tears: बॉलिवूडची अभिनेत्री सोनम कपूर रॅम्प वॉक करताना अचानक ढसाढसा रडू लागली. यामागचे नेमकं कारण, जाणून घ्या.
Sonam Kapoor Breaks Down In Tears
Sonam KapoorSAAM TV
Published On

फॅशन क्वीन बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor ) नेहमी तिच्या स्टाइलसाठी ओळखली जाते. तिच्या लूकचे तर चाहते दिवाने आहेत. ती नेहमी कोणत्या ना कोणत्या ना कारणामुळे चर्चेत असते. सध्या सोनम कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री सोनम कपूर ढसाढसा रडताना दिसत आहे. सोनम कपूरला रॅम्प वॉक करताना अश्रू अनावर झाले आहेत.

सोनम कपूर नुकतीच 'ब्लेंडर्स प्राइड एक्स एफडीसीआय फॅशन टूर २०२५'मध्ये सामील झाली होती. यावेळी तिने आपल्या हटके स्टाइलमुळे जबरदस्त रॅम्प वॉक केला. मात्र रॅम्प वॉक करताना सोनमला अचानक रडू आले आणि ती ढसाढसा रडू लागली. पण सोनम कपूरने रॅम्प वॉक थांबवला नाही. स्टेजवर रॅम्प वॉक करताना दिवंगत प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बाल उर्फ गुड्डा यांची आठवण सोनम कपूरला आली आणि ती रडू लागली.

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात रोहित बाल यांचे वयाच्या ६३व्या वर्षी निधन झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ सोनमने हा रॅम्प वॉक केला. शेवटी तिने हात जोडून नमस्कार केला. एका मिडिया संवादात सोनम कपूर म्हणाली की, "मी गुड्डा यांच्यासाठी इथे आली होती. मी खूप आनंदी आहे. माझं भाग्य आहे की, बऱ्याचदा मला त्यांचे डिझाइन केलेले कपडे घालायला मिळाले. " सोनम कपूर रॅम्प वॉक करताना ऑफ व्हाइट गाउन आणि नक्षीदार जॅकेट परिधान केले होते. तसेच केसात गुलाब माळली होती. तिच्या या व्हिडीओ आणि लूकवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

सोनम कपूरने 'सावरिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिने स्टाइलने बॉलिवूडमध्ये खास स्थान निर्माण केले आहे. आजवर सोनम कपूरने अनेक हिट चित्रपट केले आहेत. यात आयशा, रांझणा, आय हेट लव्ह स्टोरी, निर्जा, संजू अशा चित्रपटांची नावे आहेत. तिला अनेक चित्रपटांसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सोनमचा मोठा चाहता वर्ग आहे. सोनम कपूरच्या आगामी चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Sonam Kapoor Breaks Down In Tears
Deva Box Office Collection : 'देवा' चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दुसऱ्या दिवशी वाढ, दोन दिवसात 'इतके' कमावले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com