Sangameshwar : पर्यटकांची पावले कोकणाकडे! संगमेश्वरला पाहायला जा 'ही' अद्भूत ठिकाणे

Best Travel Places In Sangameshwar : मोठ्या सुट्टीला कोकणात फिरण्याचा प्लान करा. रत्नागिरी जिल्ह्यातील 'संगमेश्वर' या ठिकाणाला आवर्जून भेट द्या आणि तेथील सौंदर्य अनुभवा.
Best Travel Places In Sangameshwar
Sangameshwar SAAM TV
Published On

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील 'संगमेश्वर' (Sangameshwar ) हे पर्यटकांचे आकर्षण आहे. संगमेश्वर हे ठिकाण सोनवी आणि शास्त्री या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. हे ठिकाण छत्रपती संभाजी महाराज यांचे वास्तव्याची जागा होती. संगमेश्वरला अनेक देवळे पाहायला मिळतात. संगमेश्वर येथे अनेक प्राचीन मंदिर पाहायला मिळतात. तु्म्ही तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रमंडळींसोबत संगमेश्वर फिरण्याचा आवर्जून प्लान करा. तुमच्या आयुष्यातील ही बेस्ट टूर असेल.

उक्षी ब्रीज

संगमेश्वरला जाताना मुंबई गोवा हायवेवर उक्षी ब्रीज लागतो. हा ब्रीज अतिशय सुंदर आहे. उक्षी ब्रीज पर्यटकांचे आकर्षण आहे. हे फोटोग्राफीसाठी बेस्ट लोकेशन आहे. या परिसरात माडाची झाडे, पोफळीच्या बागा पाहायला मिळतील.

छत्रपती संभाजी महाराज स्मारक

संगमेश्वर छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी ओळखले जाते. संगमेश्वर येथील कसबा गावात छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आहे.

कर्णेश्वर मंदिर

संगमेश्वर येथील कर्णेश्वर मंदिर हे महादेवाचे देवस्थान आहे. कसबा पेठेजवळ हे मंदिर बांधण्यात आले आहे. हे मंदिर त्याच्या स्थापत्यशैलीसाठी प्रसिद्ध आहे. मंदिराचे कोरीव काम पर्यटकांना आकर्षित करते. या मंदिरात अनेक कोरलेले लेख पाहायला मिळतील. मंदिराच्या गर्भगृहात कर्णेश्वराची पिंड देखील आहे.

Best Travel Places In Sangameshwar
Orange सिटीमधील धार्मिक स्थळे पाहिलीत का? निसर्गाचा नजरा पाहून दिपतील डोळे

संगमेश्वरला कसे जाल?

  • तुम्ही कोकण रेल्वेने संगमेश्वर रेल्वे स्थानकावर उतरू शकता.

  • बाय रोड जायचे असल्यास मुंबई-गोवा महामार्गावर कसबा संगमेश्वर तालुका येतो.

  • मुंबईहून तुम्ही डायरेक्ट एसटीनेसुद्धा जाऊ शकता. रत्नागिरी एसटी डेपोमध्ये उतरून पुढे संगमेश्वरचा प्रवास करू शकता.

Best Travel Places In Sangameshwar
Buldhana Tourist Place : पांढरेशुभ्र धबधबे, अभयारण्य अन् बरंच काही ; बुलढाण्यातील या स्थळांना नक्की भेट द्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com