मनोरंजन विश्वातील अनेकांचे आवडते कपल अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर (Aishwarya Nadkarni ) नेहमी त्याच्या डान्स रील्समुळे चर्चेत असतात. याची एनर्जी तरुणांनाही लाजवते. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर एवढ्या अभिनेत्री असूनही अजूनही फिट आणि ब्युटिफूल दिसते.
ऐश्वर्या नारकर सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत काम करत आहेत. काम, घर सांभाळताना स्वतःला फिट ठेवले आहे. ऐश्वर्या नारकरने नुकताच इंस्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्याने आपले वर्कआउट रूटीन सांगितले आहे.
ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या व्यायाम करत आहेत. तसेच व्यायामासोबत पाणी ही आपल्या शरीराला ताजे आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. ही महत्त्वाची गोष्ट त्या सांगत आहेत. त्यांनी या खास वर्कआउट रूटीन व्हिडीओला "व्यायाम टाळू नका..." असे हटके कॅप्शन दिलं आहे. तसेच त्या रोज किती आणि कसा व्यायम करतात याची माहिती त्यांनी व्हिडीओवर टेस्कमध्ये सांगितली आहे. त्यांनी लिहिलं की, ४० स्क्वॅट्स, ४० सुमो स्क्वॅट्स, २० बर्पीज, २० ग्लूट्स, २० क्रंचेस, २० जंपिंग जॅक्स आणि शेवटी २ सेट मारतात.
ऐश्वर्या नारकर यांच्या या वर्कआउट रूटीनमुळे त्या आजही फिट आणि हेल्दी राहतात आणि सुंदर दिसतात. त्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या आयुष्यातील अपडेट त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचवतात. तसेच त्या इंस्टाग्रामवर आपले अनेक वेगवेगळ्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या फोटोंमधील अदा पाहून चाहते घायाळ होतात. अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर या जोडीने आपल्या प्रेमाने महाराष्ट्राला वेड लावले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.