ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उपमा हा नाश्त्यासाठी बनवला जाणारा सर्वात सोपा आणि पौष्टिक पदार्थ आहे.
सर्वप्रथम रव्याला चांगला सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
एका कढईत तेल गरम करुन यात मोहरी, उडदाची डाळ, चण्याची डाळ, कढीपत्ता , कांदा, मिरची आणि आलं घालून परतून घ्या.
कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर यात गाजर आणि मटार घालून काही वेळ मंद आचेवर चांगले शिजू द्या.
या मिश्रणामध्ये रवा घालून व्यवस्थित परतून घ्या. यामध्ये हळूहळू गरम पाणी घालून रवा घोटून घ्या.
आता या मिश्रणात मीठ, हळद आणि गरम मसाला मिक्स करुन चांगले परतून घ्या. आणि झाकण लावून मंद आचोवर शिजू द्या.
मऊ आणि चवीनं परिपूर्ण रवा उपमा तयार आहे. यावर लिंबाचा रस आणि कोथिंबिर घालून उपमा सर्व्ह करा.