ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जेव्हा मेंदूला होणारा रक्तपुरवठा अचानक थांबतो आणि किंवा मेंदूमध्ये एखादी रक्तवाहिनी फुटुन रक्तस्त्राव होतो. तेव्हा ब्रेन स्ट्रोक येतो.
ब्रेन स्ट्रोक धुम्रपान, ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि लठ्ठपणा या सारख्या कारणांमुळे ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो.
ब्रेन स्ट्रोक येण्याआधी शरीर काही महत्वपूर्ण संकेत देत असतं. ज्याला अजिबात दुर्लक्ष करु नका.
अचानक चेहरा, हात किंवा पायामध्ये अशक्तपणा वाटणे किंवा सुन्न होणे हे ब्रेन स्ट्रोकचे लक्षण आहेत.
ब्रेन स्ट्रोक येण्याआधी डोळ्यांशी संबधित समस्या होऊ शकतात. अंधुक दिसू शकतं. किंवा डबल विजनची समस्या होऊ शकते.
काहींना चालण्यात किंवा बोलण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. याशिवाय चक्करही येतात.
विनाकारण तीव्र डोकं दुखणे किंवा मळमळ उलटी होणे हे देखील ब्रेन स्ट्रोकचं लक्षण असू शकतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.