ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
८ अळूची पाने, 25 ग्रॅम चिंच आणि गुळेचा कोळ, कोथिंबीर 300 ग्रॅम बेसन पीठ 2 ते 3 चमचे तांदळाचे पीठ 3 चमचे पांढरे तीळ हळद, 1/2 चमचा जीरे 1 चमचा तिखट, मीठ चवीनुसार, पाणी आणि तेल
सर्वप्रथम अळूची पाने स्वच्छ धुवून घ्या. यानंतर सुरीने पानांचे मधले देठ कापून घ्या.
एका भांड्यामध्ये तांदळाचे पीठ, बेसन, तिखट, मीठ, तीळ,हळद मसाला आणि चिरलेली कोथिंबिर एकत्र मिक्स करुन घ्या.
एक वाटीमध्ये चिंचेचा कोळ काढून घ्या. यामध्ये गुळ एकत्र करुन चांगले मिक्स करा.
पीठाच्या मिश्रणात चिंचेचा कोळ घाला आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठात कोणत्या प्रकारच्या गुठळ्या राहणार नाही याची खात्री करा.
आता एका पानावर हाताने हे मिश्रण व्यवस्थित लावून घ्या. यानंतर पाने उलट सुलट ठेवून दुसऱ्या पानांना देखील मिश्रण व्यवस्थित लावून घ्या.
३ ते ४ पानंची गुंडाळी करुन रोल करुन घ्या. कुकरमध्ये किंवा एका पातेल्यावर चाळणीला तेल लावून हे रोल चाळणीमध्ये झाकून ठेवा. २० ते २५ मिनिटे चांगले उकडून घ्या.
उकडून थंड झाल्यावर सुरीने वड्या कापून घ्या आणि तेलात खरपूस तळून घ्या. गरमागरम कुरकुरीत, खमंग अळूवडी सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत.