Navratri Special SAAM TV
लाईफस्टाईल

Navratri Special : दिव्यांची आरास अन् देवीची आराधना; भक्तीत तल्लीन झाला कोकण सारा

Konkan Goddess Temples : कोकणातील प्रसिद्ध देवीच्या मंदिरांना आवर्जून भेट द्या. आयुष्यातील दुःख दूर होऊन सकारात्मकतेच्या प्रकाशाने आयुष्य उजळून निघेल.

Shreya Maskar

कोकण (Konkan) हे विविधतेने आणि संस्कृतीने नटलेले आहे. कोकणाचा समुद्रकिनारा पर्यटकांचे आकर्षण आहे. येथे दरवर्षी लाखो पर्यटक निसर्गाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी येतात. कोकणाला ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील आहे. तसेच कोकणाला मोठे धार्मिक महत्त्व देखील लाभले आहे. कोकणात अनेक मंदिरे आहेत. जी खूप प्राख्यात आहेत.

सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्सव पाहायला मिळत आहे. सर्वजण देवीच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत. कोकणात देखील नवरात्री मोठ्या उत्साहाने साजरी करतात. मुंबई असो वा कोकण नवरात्रीत देवीची मंदिरे दिव्यांनी उजळून निघतात.

कोकणातील मंदिरे ही वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. कोकणात कोसाळणारे धबधबे आणि मंद पाण्याच्या लाटा अनुभवता येणारा अथांग समुद्रकिनारा लाभला. कोकणात आध्यात्मिक वातावरण तुम्हाला अनुभवता येईल. कोकणातील शक्तिशाली मंदिरे तुम्हाला ऊर्जा देतील. तुम्ही जर नवरात्रीत कोकणात असाल किंवा सुट्टीत कोकणात जाण्याचा प्लान करत असाल तर कोकणातील या देवीच्या मंदिरांना आवर्जून भेट द्या. तेथील प्रसन्नता अनुभवून तुमचे मन शांत होईल.

श्री चंडिका देवी मंदिर

दापोलीतील दाभोळ गावात श्री चंडिका देवी मंदिर आहे. हे स्वयंभू मंदिर असल्याचे तिथेल लोक बोलतात. हे मंदिर गुहेत आहे. त्यामुळे मंदिरात प्रकाश नसतो. फक्त दिव्यांच्या प्रकाशात मंदिर उजळून निघते. येथील आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य आहे. तुम्ही येथे तुमच्या कुटुंबासोबत दर्शनाला येऊ शकता. येथील देवीचे रूप पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल.

दुर्गादेवी मंदिर

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये दुर्गादेवी मंदिर वसलेले आहे. हे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या चहूबाजूला हिरवळ पाहायला मिळते. येथे एक तलाव देखील पाहायला मिळते. दुर्गा देवी व्यतिरिक्त मंदिरात भगवान विष्णू, भगवान शंकर, लक्ष्मी देवी आणि भगवान गणेश यांची देखील मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल.

भगवती मंदिर

देवगड मधील कोटकामते गावात भगवती मंदिर आहे. हे खूप प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या भिंतीवर शिलालेख पाहायला मिळतात. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आमराईने भरलेला आहे. भगवती मंदिर देवीची पाषाणाची रेखीव मूर्ती आहे. मंदिराच्या भिंतीवरचे कोरीव नक्षीकाम अप्रतिम आहे. या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT