Surat Tourism Place: नवरात्रीत बहरलं सुरत; मंत्रमुग्ध करणाऱ्या या ठिकाणांना आवश्य भेट द्या

Surat Smart City: गुजरातमधील सुरत शहर त्याच्या अनेक पर्यटन स्थळांमुळे सर्वाचं लक्ष वेधून घेत आहे. सुरत शहराला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक मोठ्या संख्येने जात असतात.
surat
suratyandex
Published On

रोजच्या जीवनातील कामाच्या व्यापापासून सर्वांनाच बाहेर पडायचं असतं. दररोज काम करुन सर्वांनाच कंटाळा आलेला असतो. सुट्टीचा पुरेपुर आनंद मिळावा म्हणून पर्यटक वेगवेगळी ठिकाणे शोधत असतात. महाराष्ट्रातील वेगवेगळी ठिकाणे शोधून पर्यटकांना एक्सप्लोर सुद्धा करायची असतात. सर्वच पर्यटकांना सुट्टीचा मनमुराद आनंद लुटायचा असतो. त्याचबरोबर मिळालेली सुट्टी कोणत्या ठिकाणी जाऊन एन्जॅाय करायची असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. म्हणून आज तुमच्यासाठी गुजरातमधील सुरत शहराच्या पर्यटन स्थळांची माहिती घेऊन आलो आहोत. या माहितीमुळे तुमचा सुरत प्रवास अगदी सुखदायी होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सुरतमधील अनेक पर्यटन स्थळे पाहायला मिळणार आहे.

गुजरातमधील सर्वात मोठे दुसरे शहर सुरत आहे. सुरत शहराला भारताची डायमंड सिटी म्हणून सुद्धा ओळखले जाते. सुरत शहरामध्ये कापड उद्योग मोठ्या प्रमाणात केला जातो. पर्यटकांना सुरत शहरात खूप काही गोष्टी पाहता येणार आहे. निसर्ग रम्य दृश्यांसह पर्यटकांना बीच, ऐतिहासिक स्थळे, संग्रहालय पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर पर्यटकांना सुरत शहराच्या खाद्यसंस्कृतीची उत्कृष्ट चव सुद्धा घेता येणार आहे. पर्यटकांसाठी सुरत शहर भेट देण्यासाठी फार उत्तम आहे. तुम्ही सुरत शहराला भेट देण्यासाठी तिन्हीं मार्गांनी जाऊ शकता. जर तुम्ही सुद्धा सुरत शहराला भेट देण्याचा विचार करत असाल तर, या शहराच्या पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या. पर्यटकांचा सुरत शहरातील अनुभन खूप अविस्मरणीय ठरणार आहे.

surat
Palghar Tourism Place: हिरवागार निसर्ग अन् मनमोहक नजारा पाहण्यासाठी मुंबईजवळील या ठिकाणांना एकदा नक्की भेट द्या

डुमास बीच

सुरतमधील डुमास बीच सर्वात प्रसिद्ध असल्याने येथे लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. डुमास बीच त्यांच्या शांततेमुळे अनेक पर्यटकाचं लक्ष वेधून घेत आहे. पर्यटकांनी डुमास बीचला भेट देण्याचा उत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च आहे. पर्यटक डुमास बीचला भेट देण्यासाठी जास्तीत जास्त सकाळी ते संध्याकाळी येत असतात. जर तुम्ही सुद्धा सुरतला जाण्याचा विचार करत असाल तर डुमास बीचला नक्की भेट द्या.

सरदार पटेल संग्रहालय

सुरतमधील सरदार पटेल संग्रहालय एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. या संग्रहालयाची स्थापना सुरत शहरात १८९० साली झाली आहे. पर्यटकांना या संग्रहालयात पुरातन वस्तू पाहायला मिळतील. ज्यामध्ये नकाशे, ऐतिहासिक कागदपत्रे, चित्रे, पुतळे अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. सरदार पटेल संग्रहालय भेट देण्यासारखे सर्वात मोठे ठिकाण आहे. पर्यटकांसाठी या संग्रहालयाला भेट देण्याची उत्तम वेळ सकाळी ते संध्याकाळी आहे. त्याचबरोबर भेट देण्याचा उत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च आहे.

surat
Ajanta Caves Tourism : अजिंठा लेणींना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; शासनाकडून इलेक्ट्रिक बसचा ताफा सुरू

तापी रिव्हरफ्रंट

पर्यटकांनी सुरतमधील तापी रिव्हरफ्रंटला नक्की भेट द्या. तापी नदी पर्यटकांना तिच्या शांतेतमुळे आकर्षित करत असते. त्याचबरोबर तापी रिव्हरफ्रंटला भेट देण्याची योग्य वेळ संध्याकाळची आहे. पर्यटक संध्याकाळी जाऊन तापी नदीचे भव्य रुप अनुभवू शकता. पर्यटक तापी रिव्हरफ्रंटचा आनंद सुरतच्या फेमस खाद्यपदार्थांच्या चवीमुळे घेऊ शकता. या ठिकाणाला भेट देण्यासाठी पर्यटक बस किंवा ऑटोने जाऊ शकता.

गुजराती जेवण

गुजरातमधील सुरत शहर त्याच्या खाद्यसंस्कृतीमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याचबरोबर सुरत शहरातील स्वादिष्ट जेवण पर्यटकांना त्यांच्या उत्कृष्ट चवीमुळे आकर्षित करत आहे. सुरतमधील विशेष खाद्यपदार्थांमध्ये लोचो, चणा डाळीपासून बनवलेली स्वादिष्ट सुरती शेव खमणी, ऊंधीयू यांसारखे अनेक पदार्थ खूप फेमस आहेत. जर तुम्ही सुद्धा गुजरात शहराला भेट देण्याचा विचार करत असाल तर, सुरतमधील फेमस खाद्यसंस्कृती नक्की ट्राय करा.

surat
Tourism Lohagad Fort : भय, साहस आणि सुंदरता एकाचवेळी तीन अनुभवांसाठी खास लोहगड; कसं जायचं?

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com