Palghar Tourism Place: हिरवागार निसर्ग अन् मनमोहक नजारा पाहण्यासाठी मुंबईजवळील या ठिकाणांना एकदा नक्की भेट द्या

Best Place In Palghar: रोजच्या धावपळीतून सुट्टीचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रातील पालघर शहराला भेट द्या. पर्यटकांना पालघरमधील अनेक गोष्टी एक्सप्लोर करता येणार आहे.
palghar
palgharyandex
Published On

महाराष्ट्रातील अनेक पर्यटक महाराष्ट्र शहराच्या ठिकाणांच्या शोधात असतात. त्याचबरोबर पर्यटकांना नवनवीन ठिकाणे एक्सप्लोर सुध्दा करायची असतात. पर्यटकांनी शोधलेल्या ठिकाणांमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळेल . या गोष्टीची सर्वानांच उत्सुकता असते. म्हणून पर्यटक सुट्टीच्या दिवशी प्लान करत असतात. अशाच पर्यटकांसाठी महराष्ट्रातील पालघर शहराची माहिती घेवून आलो आहोत. या माहितीमुळे त्यांची पालघर ट्रिप अगदी सोपी हेणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील पालघर एक मुख्य शहर आहे. या शहरांमध्ये पर्यटकांना पाहण्यासारख्या अंसख्य गोष्टी आहेत. त्याचबरोबर पालघर हा महाराष्ट्राचा ३६ वा जिल्हा आहे. पर्यटक पालघरमधील अनेक ठिकाणी जाऊन त्यांना एक्सप्लोर करु शकता. निसर्गाच्या सानिध्यात असलेले पालघर शहर त्याच्या सौंदर्यामुळे सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. जर तुम्हाला सुद्धा पालघर शहर फिरायचं आहे तर ही माहिती तुमच्यासाठी फार उपयोगी आहे. तुमचा पालघर मधील प्रवास अगदी सुखदायक होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला पालघर शहराचा अनुभव घेता येणार आहे.

palghar
Nandurbar Tourism : पर्यटकांनो! वीकेंड खास करायचाय? तर नंदुरबारच्या 'या' ठिकाणांना आवर्जून द्या भेट

रणगाव भुईगाव बीच

महाराष्ट्रातील पालघरमध्ये रणगाव भुईगाव बीच एक हिडन जेम म्हणून प्रसिध्द आहे. या बीचला भेटण्यासाठी लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. भुईगाव बीच त्याच्या निर्मळ समुद्रकिनाऱ्याने आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे ओळखला जात आहे. शांततेच्या मनमोहक दृश्यांमुळे रणगाव बीच सर्व प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेत आहे. जर तुम्ही सुध्दा पालघर मधील ठिकाणांना भेट देत असाल तर रणगाव बीचला नक्की भेट घ्या.

केळवा किल्ला

पालघरमधील केळवा किल्ला पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकात एका ऐतिहासिकदृष्ट्या बांधला होता. पर्यटकाचं केळवा किल्ला त्याच्या ऐतिहासिक दृश्यांमुळे आकर्षण ठरला आहे. केळवा किल्याचा उपयोग मराठी राजवटीत श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी करुन घेतला होता. पर्यटकांना किल्याच्या आजूबाजूला अनेक नैसर्गिक दृश्ये पाहायला मिळतील. त्याचबरोबर किल्याचा परिसर सुध्दा अनुभवता येणार आहे.

जव्हार राजवाडा

जव्हार राजवाडा पालघर शहरापासून ४२ किमी अंतरावर आहे. हा राजवाडा खासगी मालमत्तेचा आहे. पर्यटकांना या राजवाड्यात घराण्यातील सुंदर चित्रे पाहायला मिळतील. त्याचबरोबर जतन केलेल्या जुन्या वस्तू , फर्निचर पाहायला मिळेल. जव्हार राजवाड्याला भेट देण्याचा उत्तम काळ पावसाळ्यात आहे. हा राजवाडा त्याच्या अनेक गोष्टीमुळे पर्यटकाचं आकर्षण बनत आहे. या राजवाड्याचे मुख्य नाव जयविलास पॅलेस राजवाडा आहे. हा राजवाडा वारली पेंटीगसाठी सुध्दा खूप प्रसिध्द आहे.

महालक्ष्मी मंदिर

पालघरमधील महालक्ष्मी मंदिर एक हिंदू मंदिर आहे. महालक्ष्मी देवी संपत्ती आणि समृध्दीची देवी आहे. दररोज हजारो भाविक येथे येत असतात. पर्यटकांना महालक्ष्मी मंदिर त्याच्या शांतेतेमुळे आणि प्रसन्नतेमुळे आकर्षक करत आहे. जर तुम्ही सुध्दा पालघरमधील तीर्थक्षेत्रानां भेट देणार असाल तर महालक्ष्मी मंदिराला नक्की भेट द्या.

palghar
Ajanta Caves Tourism : अजिंठा लेणींना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; शासनाकडून इलेक्ट्रिक बसचा ताफा सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com