New Mumbai Picnic Spot SAAM TV
लाईफस्टाईल

New Mumbai Picnic Spot : पावसात लांब कशाला? नवी मुंबईतील निसर्गसौंदर्य अनुभवा! लहान मुलांसोबत पिकनिक प्लान करा

Children Picnic Spot : रोजच्या धावपळीतून मुलांसोबत निवांत क्षण घालवण्यासाठी नवी मुंबईतील निसर्गरम्य ठिकाणांना भेट द्या. पावसात नवी मुंबईचे सौंदर्य अजून खुलून येते.

Shreya Maskar

पावसात मुलांना फिरायला घेऊन कुठे जायचे? हा प्रश्न प्रत्येक पालकांना पडतो. वारंवार मुंबईतील तिच ठिकाणे फिरून तुमच्या मुलांना देखील कंटाळा आला असेल. तर, अशावेळी नवी मुंबईतील या १० निसर्गरम्य ठिकाणांना आपल्या मुलांसोबत भेट द्या. त्यांच्या सोबत एक दिवसीय पिकनिक प्लान करा. मुलांना या ठिकाणी खूप मजा येईल आणि नवीन अनुभव मिळेल.आता पावसात नवी मुंबईतील परिसरात तुम्हाला हिरवळ, मोकळे रस्ते, सुंदर वातावरण अनुभवायला मिळेल.

पांडवकडा धबधबा

पांडवकडा धबधबा नवी मुंबईचे सौंदर्य वाढवतो. हा धबधबा खारघरजवळ आहे. पर्यटक पावसात आवर्जून पांडवकडा धबधब्याला भेट देतात. पांडवांनी या धबधब्यात स्नान केले होते असे म्हटलं जातं. तेव्हापासून याला पांडवकडा धबधबा म्हणून ओळखले जाते.

इस्कॉन मंदिर

पर्वतरांगांनी वेढलेले खारघरचे इस्कॉन मंदिर वास्तुकलेचा अद्भुत नमुना आहे. या मंदिरात जन्माष्टमी आणि रामनवमी मोठ्या उत्सवात साजरी करतात. नवी मुंबईतील लोक मोठ्या संख्येने इस्कॉन मंदिराला भेट देतात.

कर्नाळा पक्षी अभयारण्य

तुम्ही जर पक्षीप्रेमी असाल तर नवी मुंबईतील कर्नाळा पक्षी अभयारण्याला आवर्जून भेट द्या. तुमच्या मुलांना जवळून निसर्गाचा अनुभव घेता येईल. त्यांना पक्ष्यांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतील. तसेच येथे तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.

रॉक गार्डन

नवी मुंबईतील नेरुळमध्ये असलेले रॉक गार्डन पिकनिक स्पॉट म्हणून प्रसिद्ध आहे. लहान मुलांचे हे आकर्षण आहे. येथे मुलांसाठी संध्याकाळची टॉय ट्रेन देखील उपलब्ध आहे.

नेरुळ फ्लेमिंगो पॉइंट

नेरुळ मधील पाणथळ प्रदेशात असंख्य फ्लेमिंगो तुम्हा पाहायला मिळतील. यासाठी तुम्ही नेरुळ फ्लेमिंगो पॉइंटला भेट द्या. फ्लेमिंगोची सुंदर छायाचित्रे टिपण्यासाठी पर्यटकांची येथे गर्दी जमते.

बेलापूरचा किल्ला

बेलापूरचा किल्ला हा जंजिऱ्याच्या सिद्दीने बांधला आहे. येथे आल्यावर तुम्हाला इतिहासाची आठवण होईल. तसेच मुलांना इतिहासातील गोष्टी समजतील. फोटोग्राफीसाठी हे उत्तम ठिकाण आहे.

सागर विहार गार्डन

न‌वी मुंबईतील सागर विहार गार्डनला नेहमी पर्यटकांची गर्दी असते. या गार्डनमध्ये विविध प्रजातींची फुले आणि वनस्पती आढळतात. सागर विहार गार्डन न‌वी मुंबईतील वाशी या ठिकाणी आहे.

नेरुळ बालाजी मंदिर

नवी मुंबईतील नेरुळ मधील बालाजी मंदिर हे पर्यटकांचे आकर्षण आहे. नेरुळ बालाजी मंदिर हे नेरुळच्या पश्चिमेला एका छोट्या टेकडीवर वसले आहे. याच्या आजूबाजूला गणपती मंदिर, श्री पद्मावती देवी मंदिर देखील आहे.

वंडर्स पार्क

नवी मुंबईतील वंडर्स पार्कमध्ये तुम्हाला जगातील सात आश्चर्य पाहायला मिळतील. तसेच या पार्कमध्ये सुंदर तलाव देखील आहे. सायंकाळी येथील निसर्ग आवर्जून अनुभवा.

सेंट्रल पार्क

नवी मुंबईतील सेंट्रल पार्क हे मोठे थीम पार्क आहे. या उद्यानात नृत्य, संगीत,स्पोर्ट्स क्लब, मनोरंजनाच्या राइड, थिएटर शो इत्यादी गोष्टी होत राहतात. येथे तुमच्या मुलांना खूप आनंद मिळेल. पार्कमध्ये कॅफे देखील आहे. हे थीम पार्क खारघर मध्ये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident : पेट्रोलने भरलेल्या ट्रॅकरने महिलेला चिरडले; महिलेचा जागीच मृत्यू

Home Remedies: बदलत्या हवामानात रोगांपासून संरक्षण देईल 'हे' हिरवे पान, आजारांवर रामबाण उपाय!

Maharashtra Live News Update: भर पावसात मृत्युदेहाची हेळसांड, कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातील प्रकार

Bajirao Peshwa Statue Controversy : आम्हीच बाजीराव पेशव्यांचे वंशज, डीएनए तपासा; मस्तानीच्या वंशजांचा दावा

Most Dangerous River: भारतातील सर्वात धोकादायक नदी कोणती माहित आहे का?

SCROLL FOR NEXT