GavliDev Waterfall : निसर्गाच्या कुशीत चिंब भिजा, पाहा सौंदर्याने बहरलेला गवळीदेव धबधबा

GavliDev Waterfall Monsoon : पावसाळ्यात मुंबई जवळ फिरण्याचा प्लान करत असाल तर, नवी मुंबईतील निसर्गाने समृद्ध असलेल्या गवळीदेव धबधब्याला आवर्जून भेट द्या.
GavliDev Waterfall Monsoon
GavliDev WaterfallSAAM TV
Published On

गेले काही दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. अशात तुम्ही मित्रमंडळींसोबत मस्त निसर्गाच्या सान्निध्यात फिरण्याचा प्लान करत असाल तर नवी मुंबईतील गवळीदेव धबधब्याला नक्की भेट द्या. धबधब्याला जाऊन पावसाचा मनसोक्त आनंद लुटा.

पावसात नवी मुंबईचे सौंदर्य खुलून आले आहे. गवळीदेव धबधब्याचा बहरलेला निसर्ग पाहण्यासाठी घणसोली शहराला नक्की भेट द्या. गवळीदेव धबधबा घणसोली टेकडी किंवा घणसोलीचा वॉटरफॉल या नावाने देखील ओळखला जातो. नवी मुंबईतील गवळीदेव धबधबा पर्यटकांचे आकर्षण आहे. या निसर्गाच्या सौंदर्यात मोठ्यापासून लहानपर्यंत सर्वांना मदत करता येईल.

गवळीदेव धबधब्याला अनेक पर्यटक वीकेंड प्लान करतात. या धबधब्याच्या एका बाजूला औद्योगिक परिसर तर दुसऱ्या बाजूला निसर्गाचे अद्भूत सौंदर्य दिसत आहे. डोंगर चढताना येथील दिसणारी हिरवळ डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. डोंगर चढल्यावर उंच कड्यावरून कोसळणारा फेसाळलेला धबधबा मंत्रमुग्ध करून टाकतो. त्यामुळे पावसाळ्यात या धबधब्याला आवर्जून भेट द्यावी.

गवळीदेव धबधब्याला भेट दिल्यावर तुम्हाल येथील टेकडीवर असलेले गवळी-देव मंदिर पाहता येईल. कुटुंबासोबत फिरण्यासाठी हा उत्तम पिकनिक स्पॉट आहे. गवळीदेव धबधब्याला जाताना लागणारी पायवाट येथील पर्यटनाचे आकर्षण आहे. घनदाट जंगलातून ही पायवाट निघते. पक्ष्यांचा किलबिलाटात प्रवास आनंदाचा होतो. या पायवाटेवर चालताना थकल्यावर आरामात बसण्यासाठी बाकडेही ठेवण्यात आले आहेत. पावसाळी खाण्याचे छोटे स्टॉल तुम्हाला येथे दिसतील. गवळीदेव धबधबा एक दिवसीय पिकनिकसाठी उत्तम ठिकाण आहे.

GavliDev Waterfall Monsoon
Borivali Places To Visit: मुंबईच्या गर्दीत लपलीये ४ अप्रतिम ठिकाणं; इथे जाताच टेन्शन विसरून जाल

गवळीदेव धबधब्याला कसे जावे?

ठाणे स्टेशनला उतरल्यावर रिक्षा, टॅक्सीच्या साहाय्याने तुम्ही गवळीदेव धबधब्याला भेट देऊ शकता. तसेच घणसोली स्टेशनपासून हा धबधबा जवळ आहे.

GavliDev Waterfall Monsoon
Kolhapur Paleshwar Waterfall: पालेश्वर धबधब्याचे मंत्रमुग्ध करणारे दृश्य ड्रोन कॅमेरात कैद, पाहा व्हिडीओ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com