Borivali Places To Visit: मुंबईच्या गर्दीत लपलीये ४ अप्रतिम ठिकाणं; इथे जाताच टेन्शन विसरून जाल

Picnic points in Borivali: पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की पर्यटक निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लान करतात. महाराष्ट्रात निसर्गसौंदर्यांने नटलेली अनेक ठिकाणे आहेत.
Borivali Places To Visit: मुंबईच्या गर्दीत लपलीये ४ अप्रतिम ठिकाणं; इथे जाताच टेन्शन विसरून जाल
Borivali Picnic PointSaam TV

पावसाळ्याचे (Monsoon) दिवस सुरू झाले की पर्यटक निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लान करतात. महाराष्ट्रात निसर्गसौंदर्यांने नटलेली अनेक ठिकाणे आहेत. मात्र मुंबईच्या आसपास अशी काही ठिकाणे आहेत जी आपल्याला माहित देखील नाहीत. त्यामुळे तुम्ही जर मुंबईच्या आसपास फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर ही माहिती नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरू शकते. चला तर मग आज जाणून घेऊया निसर्ग सौंदर्याने नटलेली मुंबईच्या बोरिवलीतील काही ठिकाणे

Borivali Places To Visit: मुंबईच्या गर्दीत लपलीये ४ अप्रतिम ठिकाणं; इथे जाताच टेन्शन विसरून जाल
IRCTC Kerala Trip: हिरवा निसर्ग, अथांग समुद्र अन् बरंच काही; IRCTC सोबत केरळची ही ट्रिप नक्कीच करा

मुंबई उपनगरातील बोरिवली या परिसरात अनेक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, कान्हेरी लेणी, गोराई बीच आणि ग्लोबल पागोडा ही चार ठिकाणे बोरिवलीतील प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. विषेश म्हणजे बोरिवली या स्टेशनवर उतरल्यानंतर अगदी काही मिनिटांच्या अंतरावर ही पर्यटन स्थळे आहेत. या ठिकाणी भटकंती करताना पावसाळ्यात वेगळाच आनंद मिळतो.

Borivali Places To Visit: मुंबईच्या गर्दीत लपलीये ४ अप्रतिम ठिकाणं; इथे जाताच टेन्शन विसरून जाल
Stress Management : काम, प्रवास, कुटुंब सगळीकडेच ताण जाणवतोय; ट्राय करा हे उपाय

'ही' आहेत बोरिवलीमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळे

1) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान -

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (National park) जगातील एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे. हे मुंबईतील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. SGNP हे आशियातील सर्वाधिक भेट दिलेल्या राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे. या उद्यानात बिबट्या, वाघ, मुंगूस, चार शिंगे असलेले काळवीट, हरीण, सांबर, उंदीर, रानडुक्कर, वानर, माकड आणि साप यांसह इतर प्राणी आहेत. तसेच पावसाळ्यात या उद्यानाची सुंदरता अधिकच बहरते.

2) कान्हेरी लेणी -

कान्हेरी लेणी (Kanheri Caves) ही मुंबईतील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक प्रसिद्ध लेणी आहे. ही लेणी काळाकुट्ट दगड तासून बनवलेली आहे. या लेण्यांमधून भारताच्या बुद्धकाळातील कला आणि संस्कृतीचे दर्शन घडते. विषेश म्हणजे पावसाळ्यात ही लेणी बघण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करतात.

3) गोराई बीच -

मुंबईच्या बोरिवलीतील गोराई (Beach) हे ठिकाण फार सुंदर आहे. इथला समुद्रकिनारा खुप प्रसिद्ध आहे. गोराई बीच हा मुंबईतील सर्वात स्वच्छ आणि सर्वात शांत समुद्रकिनारा म्हणुन ओळखला जातो. बोरिवली पश्चिमेतून बस किंवा रिक्षाच्या सहाय्याने गोराईला जाता येते. तुम्हाला खासकरून आपल्या पार्टनर सोबत वेळ घालवायचा असेल तर गोराई बीच हे उत्तम पर्याय असू शकते.

4) ग्लोबल पागोडा -

बोरिवलीच्या गोराई येथील ग्लोबल विपश्यना पागोडा पाहण्यासारखे स्थळ आहे. शांतता शोधणार्‍यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. गोराई खाडीतून फेरीने पागोडापर्यंत पोहोचता येते. ग्लोबल पागोडा जगातील आधुनिक आश्चर्य मानले जाते. हा पागोडा स्थापत्य शैलीचा अनोखा आविष्कार असून यामुळे बौद्ध धर्माची एक वेगळी ओळख समोर येते शिवाय याठिकाणी अतिशय सुंदर आणि सर्व सुविधा युक्त विपश्यना केंद्र आहे जिथे तुम्ही मेडिटेशन करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com