Picnic Spots in Mumbai: मुंबईजवळ हटके पिकनिक स्पॉट, कुटुंबाला घेऊन ५ ठिकाणी नक्की भेट द्या

Mumbai Travel Places: फॅमिली टाईम खुप महत्त्वाचा असतो. मात्र आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे वेळ मिळत नाही. तुम्ही सुद्धा दररोजच्या धावपळीच्या जीवनशेलीपासून थोडासा ब्रेक घ्या आणि मुंबई जवळील या ठिकाणांना नक्की भेट द्या.
Picnic Spots in Mumbai
Mumbai Travel Placescanva
Published On

सकाळचा चहा झाला की ऑफिसला पोहोचण्याची गडबड नेहमीचीच. पण मग एकदिवस आभाळ भरून येतं. पाऊस भिरभिरू लागतो. आणि आपल्याला मान्सून वेकेशन्सचे वेध लागतात. मुंबईपासून जवळ, एका दिवसात जाऊन येण्यासारखी 5 मान्सून फ्रेंडली निसर्गरम्य ठिकाणं आज मी तुम्हाला सांगणार आहे. धबधब्यात वर्षासहलीचा आनंद घेताना हल्ली अनेक अपघात घडत असल्याचं पाहायला मिळतं. त्यादृष्टीने जवळची पण सुरक्षित ठिकाणे कोणती आहेच, जाणून घ्या...

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान - दगडी बांधकामात बांधलेले राजप्रासाद, त्यावरुन वाहणारे धबधबे, आणि गौतम बुद्धांच्या स्मितहास्याची प्रचिती देणारं कुंद वातावरण मुंबइच्या अगदी मध्यात आहे. बोरिवलीचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. हे संपूर्ण जंगल पर्यटकांसाठी खुले नसले तरी कान्हेरी गुहेत मात्र जाता येतं. मुख्य दरवाजापासून बस आपल्याला आत घेउन जाते. कान्हेरी हे नाव संस्कृत मधून कृष्णगिरी शब्दापासून आलेय. इथे असलेली लेणी म्हणजे एकेकाळच्या बौद्ध भिक्कूंची तात्पुरती निवासाची सोय. संपूर्ण बेसाल्ट दगडात कोरलेली लेणी म्हणजे एक आश्चर्यच आहे.

लोणावळा - लोणावळा मुंबईहूनही जवळच. त्यात हिलस्टेशन. एका दिवसात जाऊन येण्यासाठी इथे अनेक तलाव आहेत. मळवली, शिरोटा, कुणे. धबधबे साधारण जुलै महिन्यात सूरू होतात. मात्र सुरुवातीचे काही दिवस पाण्यासोबत माती वाहून येत असल्याने पाणी गढूळ लालसर येतं. राजमाची किल्ला अशावेळी पर्यटकांचे आकर्षण ठरतो. या किल्ल्याच्या टॉपवर उधेवाडी गाव असल्याने जेवणाचाही प्रश्न सुटतो. काही वर्षांपूर्वी उत्खननात इथे एक प्राचीन शिवमंदिर आढळून आलंय. या मंदिराचं काम अजूनही अर्धवट राहीलंय. यावरून मंदिराचं काम सूरू असतानाच ते मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं की काय अशी शंका येते. इथे एक गोमूख आहे ज्यातून पाण्याची संततधार सूरू असते.

विपश्यना केंद्र - इगतपुरी म्हंटल्यावर आपल्याला आठवतं ते विपश्यना केंद्र. पण याच इगतपुरीत एक धबधब्याखाली लपलेलं जुनं शिवलिंग आहे. बाजूलाच असलेला ट्रिंगलवादी किल्ला आणि त्यावर असलेला उभा कोरलेला हनुमान. एक दिवस जाऊन येण्यासाठी मुंबईजवळची ही सर्वोत्तम जागा आहे. तुमच्याकडे थोडासा वेळ असल्यास गोएका यांनी सूरू केलेल्या विपश्यना केंद्रात जाऊन एक दिवसाचा मेडिटेशन प्रोग्राम करू शकता.

चिंचोटी धबधबा - पश्मिम रेल्वेच्या नायगाव स्टेशनवर उतरल्यावर चिंचोटी धबधबा म्हणजे अगदी जवळचे पर्यटन स्थळ. इथून 3 तासांच्या चढाईंनंतर तुंगारेशवरचं जंगल सूरू होतं. बिबट्याचा वावर असलेलं हे जंगल घनदाट असलं तरीही शहरापासून जवळ असल्याने तेवढेसे धोकादायक नाही. चिंचोटी धबदब्याच्या पायथ्यापासून ट्रेकला सुरुवात केल्यानंतर संपूर्ण वॉटरफॉल क्लाईंब करता येतो. टॉपवर पोहोचल्यानंतर संपूर्ण विरार आणि वसईचा नजारा दिसतो.

वसई किल्ला - जवळच वसईचा किल्ला आहे. हा किल्ला भुईकोट स्वरूपाचा असल्यामुळे फिरताना थकवा जाणवत नाही. पोर्तुगीजनी बांधलेला 108 एकर जमिनीवर पसरलेला हा किल्ला 3 बाजूनी समुद्राने वेधलेला आहे. इथे 9 चर्च आहेत. त्यात काही नवं नाही पण एक चर्च चक्क एका मजल्यावर बांधलेलं आहे. दगडी बांधकामत बांधलेला हा किल्ला पडझड झालेला असला तरी पावसानंतर मात्र पर्यटकांचं आकर्षण ठरतो

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com