निसर्गाच्या सानिध्यात वसलेला रंधा धबधबा भंडारदरा बस स्टॉपपासून १० किमी अंतरावर आहे.
पुण्यापासून १५६ किमी आणि मुंबईपासून १७७ किमी अंतरावर रंधा धबधबा असून अहमदनगर जिल्ह्यातील राजूर-भंडारदरा येथे आहे.
प्रवरा नदीवर हा धबधबा तयार झाला आहे. तसेच तो 170 फूट उंचीवरून खाली धो धो कोसळतो.
येथे भेट देण्यासाठी तुम्ही अहमदनगर किंवा भंडारदऱ्यावरून भेट देऊ शकता.
येथील नदीच्या काठावर मंदिर सुद्धा आहे. अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात.
या धबधब्यावर डोंगराळ भागात कडेकपारांत मधमाश्यांचे अनेक पोळे आहेत.
तुम्ही मित्रपरिवार आणि कुटुंबीयांसह या धबधब्यावर फिरण्यासाठी जाऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.