IRCTC Tour Of South India: IRCTC ची नवी टूर; फॅमिली, फ्रेंड्ससोबत फिरा साउथ इंडिया; किती खर्च येणार? जाणून घ्या

IRCTC Package Of South India Tour: दक्षिण भारत हे खूप सुंदर ठिकाण आहे. हिरवागार निसर्ग अन् समुद्र या गोष्टींचा सुंदर मिलाप या ठिकाणी पाहायला मिळतो. जर तुम्हालाही साउथ इंडिया फिरायचे असेल तर आयआरसीटीसीचे टूर पॅकेज नक्की बुक करा.
IRCTC Tour Of South India
IRCTC Tour Of South IndiaSaam Tv
Published On

प्रत्येक व्यक्तीला आपल्या रोजच्या कामातून ब्रेक हा हवा असतो. आपले मन आणि शरीर प्रसन्न राहावे यासाठी प्रत्येकाने ब्रेक घ्यावा.यासाठी फिरणे हा बेस्ट पर्याय आहे. प्रत्येकालाच फिरायला आवडते. वेगवेगळ्या ठिकाणांना भेट द्यायला आवडते. दक्षिण भारत हे फिरण्यासाठी बेस्ट ठिकाण आहे. अनेकजण वर्षातून एकदातरी फिरायला जातात. जर तुम्हीही या वर्षी फिरायला जायचा प्लान करत असाल तर आयआरसीटीचे हे पॅकेज नक्की बुक करा.

IRCTC Tour Of South India
GavliDev Waterfall : निसर्गाच्या कुशीत चिंब भिजा, पाहा सौंदर्याने बहरलेला गवळीदेव धबधबा

नोव्हेंबरमध्ये दक्षिण भारतात फिरण्याची मज्जा काही वेगळीच असते. थंडीच्या काळात हिरवागार निसर्ग पाहण्यासाठी अनेक लोक ट्रीप प्लान करतात. IRCTC च्या पॅकेजमध्ये तुम्ही कन्याकुमारी, मदुराई, रामेश्वरम या ठिकाणी फिरायला जाऊ शकतात. या ट्रिपमध्ये तुम्हाला राहण्याची-खाण्यापिण्याची सोय आणि विमान तिकिटांचा समावेश आहे.

दक्षिण भारताची ही ट्रिप ५ रात्र आणि ६ दिवसांची असते. या ट्रिपमध्ये तुम्ही फ्लाइटने प्रवास करु शकतात. यामध्ये तुम्ही कन्याकुमारी, कोवलम, मदुराई, रामेश्वरम, त्रिवेंद्रम या शहरांना भेट देणार आहेत.

या पॅकेजमध्ये तुम्हाला चांगल्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली जाईल. तसेच जेवणाची उत्तम सोय असेल. या पॅकेजमध्ये प्रवास विम्याचीदेखील सुविधा आहे.

IRCTC Tour Of South India
Monsoon Foot Care : पावसाळ्यात पायांना खाज सुटतेय? व्हा सावधान! वाढेल इन्फेक्शनचा धोका, असा टाळा संसर्ग

या ट्रिपमध्ये जर एक व्यक्ती प्रवास करत असेल तर तुम्हाला ५३,५०० रुपये पैसे द्यावे लागणार आहेत. तर दोन लोक एकत्र प्रवास करत असतील तर प्रति व्यक्ती ४०,८०० रुपये भरावे लागणार आहेत. तीन व्यक्ती एकत्र ट्रीप करत असाल तर तुम्हाला ३९,१०० रुपये प्रति व्यक्ती पैसे भरावे लागणार आहेत. मुलांसाठी वेगळे शुल्क आकारण्यात येणार आहे. ५-११ वर्षीय मुलासाठी ३२,३०० रुपये द्यावे लागणार आहे.

IRCTC Tour Of South India
Dragon Fruit For Diabetes Control : मधुमेहाच्या रुग्णांसाठी ड्रॅगन फ्रूट वरदान! कायम ब्लड शुगर राहील नियंत्रणात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com