Dragon Fruit For Diabetes Control : मधुमेहाच्या रुग्णांसाठी ड्रॅगन फ्रूट वरदान! कायम ब्लड शुगर राहील नियंत्रणात

Diabetes Control Tips : बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेक लोकांना मधुमेहाची समस्या उद्भवते. त्यामुळे कायम शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर ठरते.
Diabetes Control Tips
Dragon Fruit For Diabetes ControlSAAM TV
Published On

ड्रॅगन फ्रूट बाजारात सहज उपलब्ध असते. पण त्यांची किंमत जास्त असल्यामुळे लोक ड्रॅगन फ्रूट खाणे टाळतात. अशात आरोग्याची काळजी सर्वात महत्वाची असते. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी आठवड्यातून तीन वेळा तरी ड्रॅगन फ्रूटचे सेवन करावे. ड्रॅगन फ्रूट मधुमेहाच्या रुग्णांसाठी खजिना आहे. ड्रॅगन फ्रूटमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. जे आरोग्याला तंदुरुस्त ठेवतात. ड्रॅगन फ्रूट फळ मधुमेहासोबत हृदयाचे आरोग्यही चांगले ठेवते.

मधुमेह

ड्रॅगन फ्रूट हे मधुमेहासाठी रामबाण उपाय आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. तसेच लठ्ठपणा येत नाही. सर्वात जास्त फायदा प्रीडायबेटिस आणि टाईप-2 मधुमेहाच्या रुग्णांना ड्रॅगन फ्रूटच्या सेवनाचा जास्त फायदा होतो. ड्रॅगन फ्रूट इन्सुलिनच्या प्रतिकारापासून आपला बचाव करते.

ड्रॅगन फ्रूटमधील बिया

ड्रॅगन फ्रूटमधील काळ्या बियांमध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-९ फॅटी ॲसिड्स आढळतात. यांच्या सेवनामुळे हृदय निरोगी राहते. तसेच रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होतात. ड्रॅगन फ्रूट खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी मदत करतात. तसेच ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

Diabetes Control Tips
Tips For Healthy Eating : पचनशक्ती झाली कमकुवत? तर पारंपारिक बैठक अवलंबा, जमिनीवर मांडी घालून जेवण करा

पचनक्रिया सुरळीत

ड्रॅगन फ्रूट महाग जरी असले तर आरोग्याला त्यांचे असंख्य फायदे होतात. नियमित ड्रॅगन फ्रूटचे सेवन केल्यास पोटासंबंधित समस्या दूर होतात. तसेच आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. कारण ड्रॅगन फ्रूटमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. जे आपली पचनक्रिया चांगली ठेवते.

स्नायूंचे आरोग्य मजबूत

ड्रॅगन फ्रूट कॅल्शियम आणि मॅग्नेशियमयुक्त आहे. ज्यामुळे आपली हाडे आणि स्नायू मजबूत राहण्यास मदत करतात. ड्रॅगन फ्रूटमधील फ्री रॅडिकल्स अकाली वृद्धत्वापासून आपले संरक्षण करतात.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Diabetes Control Tips
Onion Health Benefits : पावसात नियमित करा कांद्याच्या रसाचे सेवन, सर्दी खोकल्यापासून लगेच मिळेल सुटका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com