Navi Mumbai News : फ्लेमिंगो पक्षांची साईन बोर्डला धडक; ४ पक्षांचा मृत्यू तर २ जखमी

Flamingos Accident: नवी मुंबईत फ्लेमिंगो पक्षांचा अपघात झाला आहे. दिशादर्शक फलकाला आदळून चार फ्लेमिंगो पक्षांचा मृत्यू झालाय, तर दोन पक्षी जखमी झाले आहेत.
Flamingos
Flamingos Saam Tv
Published On

Flamingos Accident In Navi Mumbai

नवी मुंबईत (Navi Mumbai) परदेशी पाहुणे फ्लेमिंगो ऑक्टोबर ते मे महिन्यादरम्यान हजेरी लावतात. यावर्षीही फ्लेमिंगो शहरात आलेले आहेत. नवी मुंबई ‘फ्लेमिंगो सिटी’ (Flamingo City) या नावाने देखील ओळखली जाते. पण या फ्लेमिंगो सिटीतच फ्लेमिंगोंचा मोठा अपघात झाला आहे. या घटनेबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Weather Update)

नवी मुंबईतील एनआरआय जवळ असलेल्या नेरुळ जेट्टी मार्गावर मोठा दिशादर्शक फलक लावण्यात आलाय. या फलकाला सहा फ्लेमिंगो पक्षी आदळले. या घटनेत चार फ्लेमिंगो पक्षांचा मृत्यू (flamingos died) झालाय, तर दोन फ्लेमिंगो पक्षी जखमी झाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फ्लेमिंगो पक्षांचा अपघात

नेरुळ जेट्टी अद्याप वापरात नाही. आजूबाजूला पाणथळ क्षेत्र असल्यानं हजारो फ्लेमिंगो पक्षी या ठिकाणी येतात. फ्लेमिंगो (flamingos) पक्षांचा हा फ्लाईंग झोन आहे, असं असतानाही या परिसरात मोठा दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे. सिडकोमार्फत उभारण्यात आलेल्या नेरुळ जेट्टीचा दिशादर्शक फलक उंचीवर उभारण्यात आल्याने हा अपघात घडलाय.

तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

एकीकडे नवी मुंबई शहर (Navi Mumbai) फ्लेमिंगो सिटी म्हणून नावारूपास आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र दुसरीकडे फ्लेमिंगोच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करायचं अशी टीका पक्षीप्रेमी व्यक्त करत आहेत. या दुर्घटनेनंतर नेरुळ जेट्टीचा दिशा दर्शक फलक तात्काळ काढण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पर्यावरण प्रेमिंनी दिलाय.

Flamingos
Nandurbar Accident: भाजप महामंत्री विजय चौधरी यांच्या वाहनाला अपघात; वाळू वाहणाऱ्या डंपरची धडक

स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत वाढ

सिगल, ऑस्ट्रेलियन डक, फ्लेमिंगो अशा विविध जातींचे परदेशी पक्षी वाशी आणि ऐरोलीच्या खाडी पुलांवर सहज दिसून येत असतात. ऑक्टोबर महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत हे पक्षी येथे आढळून येतात. दरवर्षी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या वाढतच जात आहे. कांदळवनांमध्ये आणि पाणथळींमध्ये अन्नाच्या शोधात बसलेल्या पक्ष्यांना पाहण्यासाठी बघ्यांची एक वेगळीच पर्वणी असते. त्यामुळं या पक्ष्यांची ओळख नवी मुंबई (Flamingos In Navi Mumbai) शहराला जागतिक पातळीवर एक वेगळी दिशा देण्यास मदत करतेय.

गेल्या वर्षीही एप्रिल महिन्यात याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी दाखल झाले होते. गेल्या वेळी या ठिकाणी दीड लाखांहून अधिक फ्लेमिंगो पोहोचले होते. येथे पोहोचणारे छोटे फ्लेमिंगो गुजरातमधील कच्छ प्रदेश आणि राजस्थानच्या सांभर सरोवरातून येतात, तर मोठे फ्लेमिंगो इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इस्रायलसारख्या देशांतून लांबचा प्रवास करून येथे पोहोचतात.

Flamingos
Bird Sanctuary In Maharashtra | पक्षीप्रेमींसाठी बेस्ट आहेत महाराष्ट्रातील अभयारण्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com