Tomato Dosa Recipe SAAM TV
लाईफस्टाईल

Tomato Dosa Recipe : पीठ न आंबवता पौष्टिक डोसा आता मिनिटांत तयार होणार; कसं? तुम्हीच वाचा

Breakfast Dishes : ऑफिसला जाताना नाश्त्यासाठी झटपट होणारा पदार्थ शोधत असाल तर, टोमॅटो डोसा आवर्जून बनवा. हा पौष्टिक डोसा न आंबवता तयार करता येतो. सोपी रेसिपी जाणून घ्या.

Shreya Maskar

आजकाल नाश्त्याला साऊथ इंडियन पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. ते बनवायला सोपे आणि खायला चविष्ट लागतात. पावसात अनेकांना गरमागरम आणि चटपटीत नाश्ता लागतो. अशा वेळी तुम्ही टोमॅटो डोसा बनवू शकता. हा डोसा कमी वेळात बनतो. तसेच यासाठी काही पूर्वतयारी देखील लागत नाही. कारण डोसा, इडली आणि वडा बनवण्यसाठी पीठ आंबवलेले लागते. पण हा टोमॅटो डोसा तुम्ही न न आंबवता देखील बनवू शकता. हा डोसा टोमॅटो प्युरी आणि उडीद डाळपासून तयार करतात. नाश्त्याला दोन टोमॅटो डोसे जरी खाल्ले तरी पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

टोमॅटो डोसा

साहित्य

  • तांदूळ

  • उडीद डाळ

  • टोमॅटो

  • कोथिंबीर

  • तेल

  • तिखट-मीठ

  • धणे -जिरे पावडर

  • लाल मिरची

  • मीठ

  • पाणी

कृती

चटपटीत टोमॅटो डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ आणि उडीद डाळ पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर उडीद डाळ, तांदूळ आणि धणे एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्या. हे मिश्रण चवीनुसार मीठ १ तास बाजूला ठेवून द्या. आता दुसरीकडे चिरलेला टोमॅटो, लाल मिरची यांची पेस्ट तयार करून घ्या. एका मोठ्या भांड्यात उडीद डाळीचे मिश्रण आणि टोमॅटो-मिरची पेस्ट छान एकत्र करून घ्या. मंद आचेवर गॅस ठेवून त्यात थोडे तेल घाला. आता या पॅनवर डोसा गोल पसरवून घ्या आणि दोन्ही बाजूने छान शेकवा. तुम्ही हा डोसा नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

Beed Politics: प्रचारात रंगलीय डुक्कर मारण्याची चर्चा, आष्टीतील उमेदवारांचे एकमेकांना चॅलेंज

SCROLL FOR NEXT