Upvasacha Dosa : उपवासाचा डोसा खाल्लाय का कधी? वाचा साहित्य, कृतीसह संपूर्ण रेसिपी

Dosa For Fast : भगर आतापर्यंत तुम्ही शिजवून त्यात मिरच्या, तेल, शेंगदाणे अशा गोष्टी मिक्स करून खाल्ले असेल. मात्र तुम्ही कधी यापासून तयार झालेला उपवासाचा डोसा खाल्ला आहे का?
Dosa For Fast
Upvasacha Dosa Saam TV

सध्या आषाढी वारी सुरू आहे. यंदा १७ जुलै रोजी आषढी एकादशी आलीये. त्यामुळे घरोघरी अनेकांचे उपवास सुरू आहेत. आता उपवासात नेहमी साबुदाण्याची खिचडी, भगर असं खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे अनेकजण उपवासाला काय खावं त्यासाठी नव्या रेसिपीच्या शोधात असतात. अशाच व्यक्तींसाठी आम्ही उपवासाची एक भन्नाट रेसिपी शोधली आहे.

Dosa For Fast
Sabudana Papad Recipe : उन्हाळ्याच्या सिझनमध्ये बनवा खुसखुशीत - कुरकुरीत साबुदाणा पापड, पाहा रेसिपी

भगर आतापर्यंत तुम्ही शिजवून त्यात मिरच्या, तेल, शेंगदाणे अशा गोष्टी मिक्स करून खाल्ले असेल. मात्र तुम्ही कधी यापासून तयार झालेला उपवासाचा डोसा खाल्ला आहे का? मार्केटमध्ये सद्धा अनोखे आणि हटके कॉम्बिनेशन असलेलं फूड खाण्याची क्रेझ आहे. त्यात उपवासासाठी त्यामुळे उपवासाच्या पदार्थांमध्ये सुद्धा आता हा क्रेझ आलाय असं म्हणायला हरकत नाही. चला तर जाणून घेऊ उपवाचा डोसा कसा बनवायचा?

साहित्य:

एक वाटी वरई/भगर

दोन चमचे साबुदाणा

एक उकडलेला बटाटा

तीन-चार हिरव्या मिरच्या

चार चमचे भाजलेले शेंगदाणे

एक चमचा दही

मीठ

पाणी

कृती :

सर्वात आधी वरई आणि साबुदाणा एकत्र एकाच भांड्यात दोन तासांसाठी भिजत ठेवा. त्यानंतर हे मिश्रणाचे मिक्सरमध्ये बारीक पीठ वाटून घ्या. पुढे एका भांड्यात बटाटे उकडण्यासाठी ठेवा. त्यानंतर शिजलेला बटाटा छान स्मॅश करा आणि शेंगदाणे, मिरच्या, दही हे सर्व काही मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.

तसेच वरई साबुदाणा पिठात हे मिश्रण मिक्स करून घ्या. त्यात चवीनुसार मीठ देखील मिक्स करा. गरजेनुसार या मिश्रणात पाणी मिक्स करा आणि गरमागरम त्याचे मस्त डोसे बनवून घ्या. तयार डोसे तुम्ही शेंगदाण्याच्या दूधासोबत देखील खाऊ शकता.

उपवासाची कचोरी

उपवासाला तुम्ही गोड कचोरी सुद्धा बनवू शकता. त्यासाठी भगर आणि साबुदाणा पीठ बनवून घ्या. या पिठाची लाटी करून त्यात सारण भरा. सारणासाठी घरच्याघरी झटपट खोबरं किसा आणि त्यात साखर किंवा गूळ मिक्स करा. त्यानंतर पिठाची लाटी करून त्यात हे मस्त सारण भरून घ्या. तयार झाली तुमची उपवासाची कचोरी.

Dosa For Fast
Sabudana Khichdi: साबुदाण्याची खिचडी मऊ आणि मोकळी बनवण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com