Eating Habits : फळांवर चाट मसाला टाकून खाणे पडू शकते महागात, किडनीचे आरोग्य धोक्यात

Adding Chaat Masala To Fruits : फळांची चव वाढवण्यासाठी त्यावर चाटमसाला आणि मीठ टाकले जाते. मात्र यामुळे फळांमधील पौष्टिक मूल्य कमी होऊन हृदय आणि किडनीचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे वेळीच ही सवय सोडा.
Adding Chaat Masala  To Fruits
Eating HabitsSAAM TV
Published On

पावसात चांगल्या आरोग्यासाठी फळांचे सेवन करणे महत्वाचे आहे. नियमित फळे खाल्ल्याने शरीराला जीवनसत्त्वे,फायबर, अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात मिळते. तसेच आपली रोग प्रतिकारकशक्ती वाढते. पचनशक्ती मजबूत होते. मात्र या फळांवर मीठ किंवा चाटमसाला टाकून खाल्ल्याने फळांची पोषक तत्वे नष्ट होतात. फ्रूट सॅलड हा हेल्दी डायटचा भाग आहे. त्यामुळे त्याचा नैसर्गिक पद्धतीने आस्वाद घ्यावा. विनाकारण चाटमसाला आणि मीठ घालून त्याचे पोषण कमी करू नये.

किडनीचे आरोग्य धोक्यात

अनेक लोकांना फळांवर मीठ किंवा चाटमसाला घालून खाण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्याला घातक ठरते. जेव्हा आपण फळांवर मीठ आणि चाटमसाला घालून खातो. तेव्हा फळांना जास्त पाणी सुटते. त्यामुळे फळातील पोषक घटक पाण्यासोबत निघून जातात. तसेच चाटमसाला आणि मीठामुळे फळांमधील सोडियमचे प्रमाण वाढते. यामुळे किडनीला हानी पोहोचू शकते.

त्वचेच्या ॲलर्जी

फळांमध्ये मीठ किंवा चाटमसाला घातल्यास त्वचेच्याअॅलर्जीचा धोका वाढतो. तसेच यामुळे शरीराला देखील सूज येते. मीठाच्या अतिसेवनामुळे छातीत जळजळ सुरु होते. सकाळी फळांवर चाटमसाला टाकून खाल्ल्यास दिवसभर अस्वस्थ वाटते. हात-पायांवर सूज येते.

पोटासंबंधित आजार

फळांवर चाटमसाला आणि मीठ टाकल्यामुळे त्याचा पीएच बदलतो. यामुळे पोट फुगूचा त्रास उद्भवतो. पोट जड होते. ॲसिडिटी आणि अपचन होते.

हृदयाचे आरोग्य बिघडते

फळांवर चाटमसाला आणि मीठ टाकून खाल्ल्याने उच्च रक्तदाबाची समस्या निमार्ण होते. चाटमसाल्यामुळे फळांमधील पोषक घटक निघून जातात.

Adding Chaat Masala  To Fruits
Pickle Side Effects : जेवताना तोंडी लावण्यासाठी वारंवार लोणचं खाताय? व्हा सावधान! नाहीतर वाढेल BP चा त्रास

फळ कशी खावीत?

  • पावसात फळे खाण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून घ्यावी.

  • आजकाल फळे दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यांच्यावर कीटकनाशकांची फवारणी केली जाते. त्यामुळे फळे काही वेळ पाण्यात भिजत ठेवावीत.

  • फळे कधीही नैसर्गिकरित्या खावी. त्यावर कोणतेही इतर पदार्थ टाकू नये.

  • फळे खाताना एका वेळी फक्त एक फळ खावे.

  • आंबट आणि गोड फळ कधीही एकत्र खाऊ नये.

  • फळ कापल्यावर त्वरित खावे. फळे दीर्घकाळ कापून ठेवू नये.

  • फ्रेजमधून काढलेली थंड फळे सामान्य तापमानावर आली की खावी.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Adding Chaat Masala  To Fruits
Dark Neck Tips : मान काळवंडली? मिनिटांत होईल टॅनिंग गायब, असे जपा मानेचे सौंदर्य

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com