फुकटात प्रवास करायला सर्वांना आवडतो. प्रवास करताना आपले पैसे कसे वाचतील (Tax Avoid Tolls), हा सर्वांना पहिला विचार असतो. पण अनेकदा हायवेवरून प्रवास करताना आपला टॅक्स भरावा लागतो. जर तुम्हाला हा टॅक्स भरणं वाचवायचं असेल, तर आजची ही माहिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. गुगलचं एक फिचर यासाठी आपली मदत करतंय. या या फीचरमुळे टोल टॅक्सचा खर्च वाचणार आहे. आपल्याला एकही पैसा न भरता मोफत प्रवास करू शकणार आहे. (latest marathi news)
टोल टॅक्स कसा टाळायचा
हायवे-एक्स्प्रेस वे वरून जाण्यासाठी टोल टॅक्स भरावा लागतो. टोल टॅक्स भरावा लागू नये म्हणून काही तरी मार्ग काढावा, असे अनेकदा लोकांना वाटते. या कामात गुगल मॅप्स (Google Maps) आपली मदत करणार आहे. गुगलचं हे विशेष फीचर आहे. ते आपल्याला असा मार्ग सांगतं, ज्यामुळे टोल टॅक्स आकारला जाणार नाही.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
टोलच्या खर्चातून सुटका
महामार्ग आणि द्रुतगती मार्गावरून प्रवास करणे प्रत्येकाला आवडते, परंतु टोल टॅक्स भरताना तणाव निर्माण होतो. भारतात टोल टॅक्स ही एक सामान्य गोष्ट आहे. लांबच्या प्रवासाला जाताना टोल टॅक्स (Toll tax) भरावा लागतो. अनेकदा लोकांना एकाच वेळी अनेक टोलनाके पार करावे लागतात. अशा परिस्थितीत टोल टॅक्सची रक्कम खूप जास्त होते. तुम्हाला टोलच्या खर्चातून सुटका हवी असेल, तर तुम्ही गुगलच्या विशेष सेवेचा लाभ घेऊ शकता. यासाठी गुगल मॅपवर थोडं काम करावं लागेल.
टोल टॅक्स टाळण्यासाठी गुगल मॅपमध्ये एक खास फीचर आहे. जेव्हा तुम्ही Google Maps द्वारे एखाद्या स्थानापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधता तेव्हा तुम्हाला एक मार्ग दाखवला जातो. यामध्ये तुम्हाला मार्गावर पडणाऱ्या टोल प्लाझाचा तपशीलही पाहता येणार आहे. या टोलनाक्यांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर पुढे असलेल्या पद्धतीचा अवलंब करा.
टोल टॅक्स टाळण्यासाठी 'या' गोष्टी करा
तुमच्या स्मार्टफोनवर Google Maps अॅप उघडा. तुम्हाला जायचं असलेल्या ठिकाणाचा पत्ता किंवा नाव एंटर करा. दिशानिर्देश पर्यायावर टॅप करा. आता तुम्हाला तुमचं लोकेशन निवडावं लागेल. शीर्षस्थानी वाहन निवडा. बाजूला असलेल्या तीन-बिंदू मेनूवर टॅप करा आणि पर्याय निवडा. यानंतर Avoid Tolls पर्याय निवडा. आता टोल प्लाझाशिवाय तुम्हाला रस्ता मिळणार.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की, टोलनाका चुकवायच्या नादात तुमच्या प्रवासाचं अंतर वाढणार नाही. याची विशेष काळजी घ्या. अन्यथा पैसे वाचण्याऐवजी ते जास्त प्रमाणात खर्च होवू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.