कोलेस्टेरॉल हा शरीरासाठी आवश्यक घटक असला तरी त्याचं प्रमाण जास्त झालं, तर त्याचे दुष्परिणाम गंभीर ठरू शकतात. शरीरात जेव्हा एलडीएल म्हणजेच 'वाईट कोलेस्टेरॉल' वाढतं तेव्हा हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा ब्लॉकेज यांसारख्या गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे आणि त्याची सुरुवातीची लक्षणे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
शरीरात कोलेस्टेरॉल वाढल्यावर वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसतात. विशेष म्हणजे काही भागांमध्ये वेदना जाणवणे ही त्यातील एक महत्त्वाची लक्षणे असतात. चला जाणून घेऊया, कोलेस्टेरॉल वाढल्यावर कोणत्या शरीराच्या भागात वेदना जाणवू शकतात.
पायांमध्ये वेदना किंवा पायात गोळ्या येण्याच्या समस्या
शरीरात कोलेस्टेरॉल वाढल्यावर पायांमध्ये वेदना, आकडी किंवा जडपणा जाणवू लागतो. यामागचं कारण म्हणजे रक्तप्रवाह कमी होणे. पायांकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे चालताना किंवा विश्रांती घेतानाही पाय दुखतात. अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
छातीत वेदना किंवा दडपण जाणवणे
कोलेस्टेरॉल वाढल्यावर छातीत दडपण, जळजळ किंवा घट्टपणा जाणवू शकतो. हे लक्षण हृदयविकाराच्या सुरुवातीचे संकेत असू शकतात. कारण कोलेस्टेरॉल हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साचल्याने रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि त्यामुळे छातीत दडपण निर्माण होते. हे कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) किंवा हार्ट अटॅकचे संकेतही असू शकतात.
मान, घसा आणि सांधे दुखी
कोलेस्टेरॉल वाढल्यावर काही लोकांना मान, घसा किंवा खांद्याच्या आसपास वेदना जाणवतात. शरीरातील रक्तप्रवाह अडथळलेला असल्यामुळे या भागात ताण, जडपणा किंवा स्नायूंची वेदना जाणवतात. अनेकदा हे लक्षण साध्या स्नायूंच्या वेदनेसारखे वाटते. पण प्रत्यक्षात ते वाढलेल्या कोलेस्टेरॉलचे संकेत असू शकतात.
इतर लक्षणे
कोलेस्टेरॉल वाढल्यावर हातपाय सुन्न होणे, मुंग्या येणे किंवा थंडी जाणवणे अशी लक्षणे दिसतात. काही वेळा पायांचा रंग निळसर दिसतो. डोकं जड वाटणं, चक्कर येणं, श्वास लागणे, थकवा जाणवणे किंवा डोळ्यांभोवती पिवळसर वर्तुळे दिसणे हीसुद्धा कोलेस्टेरॉल वाढल्याची चिन्हे असतात. जर शरीरात अशी लक्षणे दिसत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण योग्य वेळी उपचार न घेतल्यास ही स्थिती गंभीर आजारांमध्ये परिवर्तित होऊ शकते.
टीप: या लेखातील काही माहिती माध्यमांच्या अहवालांवर आधारित आहे. कोणतेही आरोग्यविषयक उपाय अमलात आणण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.