Kande Pohe: कांदेपोहे कधी चिकट तर कधी वातड होतात? मग या 8 टिप्स करा फॉलो

Sakshi Sunil Jadhav

कांदेपोहे रेसिपी

कांदेपोहे हा महाराष्ट्रातील सर्वात आवडता नाश्ता आहे. सकाळी झटपट होणारा आणि हलका पदार्थ म्हणून तो सगळ्यांच्याच घरात आवडीने बनवला जातो. पण अनेकदा पोहे चिकट होतात, कधी कोरडे आणि वातड होतात, तर कधी चव हरवते.

kande pohe recipe

योग्य पोहे निवडा

पोहे बनवण्यासाठी मध्यम जाडीचे पोहे वापरा. खूप बारीक पोहे लवकर चिकटतात आणि जाड पोहे नीट मऊ होत नाहीत.

kande pohe tips

धुताना काळजी घ्या

पोहे धुताना फक्त एकदा किंवा दोनदा पाण्याने स्वच्छ धुवा. सतत धुत राहिल्यास ते फुटतात आणि मऊ पडतात.

kande pohe tips

जास्त वेळ भिजवू नका

पोहे पाण्यात भिजवू नका. धुवून झाल्यावर गाळणीत ठेवून त्यांना फक्त ५-१० मिनिटं मऊ होऊ द्या. जास्त वेळ ठेवल्यास ते चिकट होतात.

kande pohe tips

कांदा नीट परतून घ्या

कांदे हलक्या सोनेरी रंगावर परता. जास्त शिजवल्यास ते जळतात आणि पोह्यांचा स्वाद बदलतो.

kande pohe tips

तेलाचं प्रमाण योग्य ठेवा

जास्त तेल वापरल्यास पोहे ओले आणि जड होतात. तर कमी तेलामुळे ते कोरडे पडतात. एक मध्यम वाटी पोह्यांसाठी १.५ टेबलस्पून तेल पुरेसे आहे.

kande pohe tips

मसाले आधी मिसळा

हळद, हिरवी मिरची आणि मीठ आधी कांद्यात मिसळा. नंतर पोहे टाका. यामुळे रंग आणि चव एकसमान पसरते.

kande pohe tips

हलक्या हाताने मिसळा

पोहे परताना जोरात ढवळू नका. ते फुटू शकतात आणि चिकट होतात. हलक्या हाताने उलथून घ्या. शेवटी लिंबाचा रस आणि कोथिंबीर घाला.

kande pohe tips

NEXT: काजळ लावल्यावर लगेच पसरतं? मग या ५ टिप्स वापराच, डोळे दिसतील सुंदर अन् टपोरे

makeup hacks | google
येथे क्लिक करा