Raksha Bandhan 2025 saam tv
लाईफस्टाईल

Raksha Bandhan: यंदाच्या रक्षाबंधनला बहिणीला तिच्या राशीप्रमाणे द्या गिफ्ट; पाहा कोणत्या राशीनुसार काय गिफ्ट द्यावं?

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि अतूट नात्याचा सण आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते, तर भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊन तिच्याप्रती असलेलं प्रेम व्यक्त करतो.

Surabhi Jayashree Jagdish

रक्षाबंधन हा सण भाऊ-बहीण यांच्यातील नात्याचा एक विशेष दिवस मानला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याच्या कपाळावर तिलक लावते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. याचवेळी भाऊही तिला आयुष्यभर रक्षणाचं वचन देतो. यंदाच्या वर्षी रक्षाबंधनाचा सण 9 ऑगस्ट 2025 शनिवार या दिवशी साजरा केला जाणार आहे. हा सण दरवर्षी श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो.

राखीच्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला गिफ्ट देतो. पण जर हा गिफ्ट तिच्या राशीनुसार दिलं तर तो केवळ तिला आनंद देणारा ठरत नाही, तर तिच्या नशिबालाही कलाटणी देणारा ठरतो. जाणून घेऊया 2025 मध्ये कोणत्या राशीच्या बहिणीला काय गिफ्ट दिल्यास ती अधिक शुभ आणि फलदायी ठरेल...

मेष राशी

मेष राशीच्या बहिणीसाठी लाल रंगाची पर्स किंवा बॅग एक उत्तम गिफ्ट ठरू शकतो. यासोबत लाल गुलाबाचा अत्तर किंवा परफ्यूम दिल्यास तिचं नशिब उजळेल.

वृषभ राशी

या राशीच्या बहिणीसाठी डिझायनर कपडे, परफ्यूम किंवा चॉकलेट्स हे उत्तम पर्याय असतील. सौंदर्य आणि आनंद या गोष्टी तिच्या राशीला अनुकूल असतात.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या बहिणींना पुस्तकं, स्मार्ट गॅजेट्स किंवा स्टायलिश पेन गिफ्ट करावं. यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेला पोषण मिळेल.

कर्क राशी

कर्क राशीच्या बहिणीसाठी फोटो फ्रेम, चांदीची दागिने, चांदीच्या बांगड्या हे शुभ गिफ्ट ठरू शकतात. ही राशी भावनिक आणि घरगुती गोष्टींशी निगडित असते.

सिंह राशी

सिंह राशीच्या बहिणीला मेकअप किट, सोनं, ब्रँडेड घड्याळं गिफ्ट करता येईल. ही रास ऐश्वर्य आणि दिमाखाशी संबंधित असते.

कन्या राशी

कन्या राशीच्या बहिणीसाठी हँडबॅग, पर्स, स्किन केअर प्रॉडक्ट्स हे योग्य गिफ्ट ठरतील. स्वच्छता आणि नीटनेटकेपणा तिच्या स्वभावात असतो.

तूळ राशी

तूळ राशीच्या बहिणीसाठी फॅशन ज्वेलरी, परफ्यूम, सुंदर साडी किंवा दुपट्टा देणं लाभदायक ठरेल. सौंदर्य आणि सौम्यता या गोष्टी तिच्या राशीचे विशेष गुणधर्म आहेत.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या बहिणीसाठी कॉस्मेटिक वस्तू, रुद्राक्ष लॉकेट गिफ्ट करू शकता. आध्यात्म आणि आंतरिक शक्तीशी तिची गाठ असते.

धनु राशी

धनु राशीच्या बहिणीसाठी धार्मिक पुस्तकं, वाचनासाठी पुस्तकं, किंवा ट्रॅव्हल पॅकेज गिफ्ट करावं. तिचा स्वभाव स्वाभाविकपणे धार्मिक आणि साहसी असतो.

मकर राशी

मकर राशीच्या बहिणीसाठी ऑफिस डायरी, पेन स्टँड किंवा सोपे पण स्टायलिश कपडे गिफ्ट करता येतील. व्यावसायिकता आणि काटेकोरपणा तिच्या जीवनशैलीचा भाग असतो.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या बहिणीला टेक्नॉलॉजीशी संबंधित गॅजेट्स, मोबाईल फोन, स्मार्ट वॉच किंवा ज्योतिषावर आधारित पुस्तक गिफ्ट करावं.

मीन राशी

मीन राशीच्या बहिणीसाठी देवांची मूर्ती, किंवा एअरपॉड्स हे गिफ्ट शुभ ठरतील. श्रद्धा आणि कलात्मकता या राशीच्या मूळ गुणधर्मांमध्ये येतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mantralaya Ceiling Collapsed: मंत्री कॅबिनेट बैठकीत बिझी असतानाच मंत्रालयात छत कोसळलं, नेमकं काय घडलं, पाहा | VIDEO

Sevai Pulao Recipe : रोजचा डाळ-भात खाऊन कंटाळलात? जेवणाला खास बनवा चमचमीत शेवयाचा पुलाव

Raksha Bandhan Saree Gift: राखीपौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या बहिणीला भेट द्या ही सुंदर साडी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीने गोर-गरिबांचा 'आनंद' हिरावला; गणेशोत्सवात नाही मिळणार 'आनंदाचा शिधा'

Apple Eating Benefits: रिकाम्या पोटी सफरचंद खाण्याचे हे फायदे माहिती आहेत का?

SCROLL FOR NEXT