
शुक्रवार हा लक्ष्मीमातेचा विशेष दिवस मानला जातो.
मसूर डाळ दान करणे मानसिक ऊर्जा वाढविते.
देवीला दिवा अर्पण करणे आनंदी वातावरण निर्माण करते.
हिंदू धर्माप्रमाणे शुक्रवारचा दिवस लक्ष्मीमातेला समर्पित मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यास घरात सुख-समृद्धी आणि धनवर्षा होते असं मानलं जातं. काही लोक देवीची विशेष कृपा मिळावी म्हणून या दिवशी उपवासही करतात. परंतु केवळ उपवास नाही तर काही साधे उपाय केल्यासही आयुष्यात सकारात्मक बदल घडतो.
ज्योतिष्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, घरातील वातावरण शांत आणि आनंददायी राहतं. यावेळी करिअर आणि आरोग्याच्याही बाबतीत चांगले परिणाम मिळण्यास मदत होते. शुक्रवारच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत आणि त्यामुळे कसे परिणाम मिळतात ते जाणून घेऊया.
जर तुम्हाला तुमची ऊर्जा टिकवून ठेवायची असेल तर शुक्रवारच्या दिवशी थोडीशी मसूर डाळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून जवळच्या हनुमान मंदिरात दान करा. हा उपाय दर शुक्रवार केल्याने मानसिक आणि शारीरिक ऊर्जा वाढते आणि अनेक क्षेत्रांमध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते.
शुक्रवारी पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. यानंतर देवी लक्ष्मीसमोर बसून उजव्या हातात एक फूल घ्या आणि ते देवीच्या पायाजवळ ठेवा. त्या फुलावर मातीच्या दिव्यात गायीचं तूप टाकून दिवा लावा. त्यानंतर देवीला लाल रंगाची ओढणी अर्पण करा. हा उपाय केल्याने घरात आनंदमय वातावरण निर्माण होतं.
शुक्रवारी एक लहानसा मातीचा कलश घ्या आणि त्यामध्ये तांदूळ भरून त्यावर एक रुपयाचा नाणं आणि हळद ठेवा. या कलशावर झाकण ठेवा आणि लक्ष्मीमातेची प्रार्थना करून तो कलश एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला दान करा. यामुळे तुमच्या आयुष्यात पैसा आणि संपत्ती येण्यास मदत होईल.
जर तुमच्या वैवाहिक नात्यात एखादा तिसरा व्यक्ती सतत येत असेल आणि त्यामुळे तणाव निर्माण झाला असेल तर शुक्रवारी एक मूठ मसूर डाळ घ्या. ही डाळ तुमच्या जोडीदाराच्या हाताला 7 वेळा स्पर्श करून घ्या. नंतर ती डाळ स्वच्छ वाहत्या पाण्यात सोडून द्या. हा उपाय केल्याने नात्यातील दुरावा कमी होतो आणि सौहार्द वाढते.
शुक्रवारी आरोग्य सुधारण्यासाठी आणि घरातील सदस्यांचं आरोग्य चांगले राहण्यासाठी लक्ष्मीमातेला तूप आणि मखाने यांचा नैवेद्य दाखवा. हा उपाय केल्याने तुमचं आरोग्य चांगलं राहतं. त्याचप्रमाणे आजार दूर राहतात.
शुक्रवारचा दिवस कोणाला समर्पित आहे आणि का?
शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि धनवर्षा होते असे मानले जाते.
मसूर डाळ दान करण्याचा काय फायदा आहे?
शुक्रवारी मसूर डाळ लाल कपड्यात बांधून हनुमान मंदिरात दान केल्याने मानसिक व शारीरिक ऊर्जा वाढते आणि यशाची शक्यता वाढते.
लक्ष्मीमातेला दिवा कसा अर्पण करावा?
पहाटे उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालून, फूल व तूपाचा दिवा लावून लाल ओढणी अर्पण करावी. यामुळे घरात आनंदमय वातावरण राहते.
धन-संपत्ती वाढवण्यासाठी कोणता उपाय सांगितला आहे?
शुक्रवारी तांदूळ, रुपयाचे नाणे आणि हळद भरलेला मातीचा कलश लक्ष्मीची प्रार्थना करून गरजू व्यक्तीला दान करावा. यामुळे धनयोग निर्माण होतो.
वैवाहिक तणाव कमी करण्यासाठी काय करावे?
शुक्रवारी मसूर डाळ जोडीदाराच्या हाताला 7 वेळा स्पर्श करून वाहत्या पाण्यात सोडावी. यामुळे नात्यातील दुरावा कमी होऊन सौहार्द वाढते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.