Budh Shukra Yuti: 5 वर्षांनंतर एकत्र येणार बुध-शुक्र; दोन्ही ग्रहांच्या युतीनंतर 'या' राशींच्या घरी येणार पैसा

Budh Shukra Yuti 2025 Effects: जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात, तेव्हा एक अतिशय शुभ योग तयार होतो, जो व्यक्तीला बुद्धिमत्तेच्या बळावर धन आणि समृद्धी मिळवून देतो.
Budh Shukra Yuti 2025 Effects
Budh Shukra Yuti 2025 Effectssaam tv
Published On

ज्योतिषशास्त्रात बुध हा बुद्धी, ज्ञान आणि कर्माचा कारक मानला जातो. त्याचप्रमाणे शुक्र हा सौंदर्य, सुख, प्रेम, ऐश्वर्य आणि वैभवाचा स्वामी समजला जातो. ज्यावेळी हे दोन प्रभावी ग्रह एकत्र येतात, तेव्हा त्यांची युती होते. या दोन्ही ग्रहांची युती सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम करू शकते.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुध आणि शुक्राच्या युतीचा काही निवडक राशींवर परिणाम होणार आहे. या दोन्ही ग्रहांची शुभ युती या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणार आहे. ज्या ठिकाणी बुध आणि शुक्र एकत्र येणार आहेत. या संयोगाचा ३ राशींवर विशेष प्रभाव दिसून येणार आहे. यामध्ये कोणत्या राशींना फायदा मिळेत ते पाहूयात.

Budh Shukra Yuti 2025 Effects
Saturn Jupiter yog: 48 तासांनंतर पलटणार 'या' राशींचं नशीब; शनी-गुरु तयार करणार शतांक योग, मिळणार फक्त पैसा

मकर रास

मकर राशीच्या राशींसाठी बुध-शुक्र युती फायदेशीर ठरणार आहे. जे लोक सध्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगल्या कंपनीकडून ऑफर मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकणार आहे.

कन्या रास

कन्या राशीसाठी ही युती यशाचे दरवाजे उघडणार आहे. बुध आणि शुक्र दोन्ही तुमच्यावर अनुकूल परिणाम करणार आहेत. लोक तुमच्याकडे आकर्षित होणार आहेत. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमच्यावर खुश राहणार आहेत. यावेळी तुमच्यावर मोठी जबाबदारी देण्याचा विचार असेल. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

Budh Shukra Yuti 2025 Effects
Kendra Trikon Rajyog: जूनमध्ये 'या' ३ राशींचं नशीब पालटणार; पैशांसह तुम्हाला मिळणार पद-प्रतिष्ठा

तुला रास

तुला राशीसाठी बुध-शुक्र युती विशेष आनंद घेऊन येणारी ठरणार आहे. या काळात प्रेमसंबंध अधिक बळकट होणार आहेत. व्यवसाय करणाऱ्यांना चांगले सौदे मिळू शकणार आहेत. काही लोक आपला व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतात. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल.

Budh Shukra Yuti 2025 Effects
Panchgrahi Yog: कर्मदाता शनी बनवणार पाॉवरफुल पंचग्रही राजयोग; 'या' राशींना मिळणार पैसा; प्रमोशनही मिळणार

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com