Sawan Somwar 2025: श्रावणातील आजच्या सोमवारी रात्रीच्या वेळेस करा 'हे' उपाय; प्रत्येक काम यश मिळेल नक्की

Shravan Somvar night remedies: श्रावण महिना भगवान शंकराचा प्रिय महिना मानला जातो. या महिन्यात शिवभक्त त्यांची मनोभावे पूजा करतात आणि सोमवारी व्रत ठेवतात. श्रावण सोमवारी केलेली पूजा आणि उपाय अत्यंत फलदायी ठरतात.
Sawan Somwar 2025
Sawan Somwar 2025saam tv
Published On
Summary
  • श्रावण महिना भगवान शंकराचा प्रिय काळ आहे.

  • श्रावणातील सोमवारी विशेष उपाय करणे शुभ मानले जाते.

  • घरगुती वाद दूर करण्यासाठी शिवपूजा करावी.

भगवान शंकराचा प्रिय महिना श्रावण सध्या सुरू आहे. श्रावणातील सोमवार हा अत्यंत खास मानला जातो. आजही श्रावणातला सोमवर असून जर या दिवशी रात्री काही खास उपाय केले गेले, तर महादेवाची कृपा सहज मिळू शकते. चला जाणून घेऊया श्रावणातील सोमवारी रात्री कोणते उपाय केल्यास शुभ फळ मिळू शकतात.

घरगुती कलह दूर करण्यासाठी उपाय

श्रावणातील सोमवारी घरातील वाद-विवाद, तणाव किंवा अशांततेपासून मुक्ती हवी असेल तर रात्रीच्या वेळी जवळच्या शिवमंदिरात जाऊन भगवान शंकराची मनापासून पूजा करा. शिवलिंगासमोर तूपाचा दिवा लावा. दिवा लावल्यानंतर त्याच ठिकाणी शांत बसून शिव चालीसा म्हणावी.

Sawan Somwar 2025
Budh Shukra Yuti: 5 वर्षांनंतर एकत्र येणार बुध-शुक्र; दोन्ही ग्रहांच्या युतीनंतर 'या' राशींच्या घरी येणार पैसा

ज्योतिष्य तज्ज्ञांच्या सांगण्यनुसार, यावेळी आपल्या चुका लक्षात घेऊन मनातल्या मनात क्षमा मागा आणि आपल्या मनोकामना तीन वेळा महादेवासमोर व्यक्त करा. या उपायामुळे घरातील वाद मिटण्यास मदत होते आणि शांतीचं वातावरण निर्माण होतं.

Sawan Somwar 2025
Shukrawar Upay: शुक्रवारच्या दिवशी 'हे' उपाय तुम्हाला करतील मालामाल; कामातील अडथळेही होतील दूर

आजारपण टाळण्यासाठी उपाय

जर शरीर किंवा मनाशी संबंधित आजार सतावत असतील तर श्रावण महिन्याच्या अखेरच्या सोमवारी रात्री भगवान शंकराची उपासना अवश्य करावी. मनापासून आणि श्रद्धेने महामृत्युंजय मंत्र 108 वेळा जपावा. या उपायामुळे शारीरिक त्रास कमी होतो आणि मानसिक शांती मिळते.

करिअर आणि यशासाठी उपाय

ज्यांना करिअरमध्ये अडथळे येत असतील किंवा यश काही मिळत नसेल त्यांनी देखील श्रावणातील सोमवारी रात्री हा उपाय करावा. श्री गणेश, भगवान शिव आणि देवी पार्वती यांची विधिपूर्वक पूजा करावी. शिवलिंगासमोर तूपाचा दिवा लावून शिव चालीसा म्हणावी. पूजा करताना आपल्या सर्व मनोकामना स्पष्टपणे महादेवासमोर बोलाव्यात. या उपायामुळे ग्रहदशा सुधारते, यशाच्या संधी वाढतात आणि मनोकामना पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो.

Sawan Somwar 2025
Ravivar che Upay: रविवारच्या दिवशी जरूर करावेत 'हे' उपाय; सूर्य देव प्रसन्न होऊन देतील आशिर्वाद
Q

श्रावण महिन्यातील सोमवार का महत्त्वाचा मानला जातो?

A

श्रावण हा भगवान शंकराचा प्रिय महिना असून, सोमवारी त्यांची पूजा केल्याने विशेष आशीर्वाद मिळतो.

Q

घरातील तणाव आणि वाद कमी करण्यासाठी कोणता उपाय सांगितला आहे?

A

श्रावणातील सोमवारी रात्री शिवमंदिरात तूपाचा दिवा लावून शिवचालीसा म्हणावी आणि मनोकामना व्यक्त कराव्यात.

Q

आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणता मंत्र जपावा?

A

श्रावण महिन्याच्या अखेरच्या सोमवारी रात्री महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करावा.

Q

करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी कोणती पूजा करावी?

A

श्री गणेश, भगवान शिव आणि देवी पार्वती यांची विधिपूर्वक पूजा करून शिवचालीसा म्हणावी.

Q

शिवपूजेदरम्यान मनोकामना कशी व्यक्त करावी?

A

पूजेदरम्यान श्रद्धेने आणि स्पष्टपणे आपल्या मनोकामना महादेवासमोर तीन वेळा बोलून व्यक्त कराव्यात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com