Yoga For Thyroid Saam Tv
लाईफस्टाईल

Yoga For Thyroid: थायरॉइडच्या समस्येमध्ये अत्यंत प्रभावी आहे ही सोपी योगासने; दररोज सराव केल्याने मिळतील अनेक फायदे

International Yoga Day 2024: सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत अनेक व्यक्ती योगा करणे पंसत करतात . मात्र ज्या व्यक्तींना थायरॉइडची समस्या आहे त्या व्यक्तींनी काही योगसाने आहेत त्यांनी ही काही योगासने केलीच पाहिजेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगभरात आज योग दिन साजरा करण्यात येत आहे. योग करणे व्यक्तीच्या अनेक आरोग्याच्या समस्येवर रामबाण उपाय मानला जातो. व्यक्तीच्या शारीरिक समस्यांपासून ते मानसिक आरोग्याच्या समस्यापासून सूटका मिळवण्यासाठी योगासने करणे प्रभावी मानली गेली आहेत. या सर्वांमुळे अनेक व्यक्ती स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी गेल्या अनेक शतकापासून योगाचा सराव करत आले आहेत. परंतू गेल्या काही वर्षांपासून योगाची लोकप्रियता जगभरात वाढली आहे. शिवाय याच पार्श्वभूमीवर योग दिन साजरा करण्यात येतो.

नियमित योगा केल्याने अनेक आरोग्याच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. अनेक आरोग्यांच्या समस्येमध्ये थायरॉईड ही एक समस्या आहे.थायरॉईड या समस्येमध्ये योग करणे अत्यंत प्रभावी ठरते. त्यात आज योग दिनानिमित्ताने थायरॉईडवर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही काही योगासने सांगत आहोत. जी तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील.

मत्सासन

थायरॉईडच्या समस्येमध्ये मत्सासन हे आसन करणे फायदेशीर ठरते. या आसनाने थायरॉईड (Thyroid)संबंधित सर्व समस्या कमी होण्यास मदत होते. मत्सासन हे आसन केल्याने मानेसंबंधित समस्या असल्यास त्यातही तुम्हाला फायदा होईल.

Matsasana

सर्वांगासन

थायरॉईडची समस्या असलेल्या व्यक्तींनी सर्वांगासन आसन करणे फायदेशीर ठरते. हे आसन केल्याने थायरॉईड ग्रंथीमध्ये असलेला रक्त प्रवाह वाढण्यास मदत होते.

Sarvangasana

हलासना

थायरॉईडची समस्या असलेल्या व्यक्तींनी हलासना हे आसन करणे फायदेशीर ठरते. या हलासना योगा केल्याने थायरॉईड ग्रंथीमध्ये रक्ताभिसरण वाढते.

Halasana

डिस्क्लेमर - सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: मविआत वाद? अनिल गोटे की जहागिरदार नेमका उमेदवार कोण? धुळ्यात उमेदवारीवरून पेच कायम

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT