Surabhi Jayashree Jagdish
काळजीची शक्यता म्हणजे आज वाहनं जपून चालवावीत. कोणाच्या सहकार्याची अपेक्षा सुद्धा नको. डोके थंड ठेवून कामे करावे लागतील.
आनंदामध्ये भर घालणारी गोष्ट म्हणजे आपल्या प्रियजनांचा सहवास तो तुम्हाला लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होणार आहेत काहीतरी. नवीन भर आयुष्यात पडेल असा दिवस आहे.
सामाजिक क्षेत्रामध्ये प्रगती आहे. राजकारणामध्ये सहभाग घ्याल. आयुष्यामध्ये नवीन दिशा नवीन मार्ग सापडण्याचा आजचा दिवस आहे.
शंकर - देवांचा देव महादेव याची उपासना आज करा. भाग्यकारक घटना घडतील. अनेकांच्या सहकार्याने आणि शुभेच्छांमुळे आज प्रगतीपथावर जाण्याचे योग्य आहेत.
दैनंदिन कामांमध्ये अडथळे येतील. कदाचित रखडतील ठरवले तशा गोष्टी होणार नाहीत. वेळ आणि पैसा सुद्धा वाया जाण्याची शक्यता आहे.
व्यवहारात हिशोब चोख ठेवावा लागेल. भागीदारी व्यवसायात सुयश लागेल. एखादी महत्त्वाची गोष्ट सुद्धा आज कानी येईल.
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. गुप्त शत्रूंचा त्रास होईल. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. धन मिळेल पण त्यासाठी खडतर प्रयत्न करावे लागतील.
हाती घेतलेल्या कामांमध्ये सुयश लाभणार आहे. कुलस्वामिनीची उपासना करावी. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
चतुर्थ स्थान हे सुखाचे स्थान आहे. आज मात्र थोडा अलर्ट सिग्नल म्हणजे कुठे जमिनीच्या कामात कोणाला जामीन राहू नका.
मुला मुलींचे प्रश्न मार्गी राहील लागतील. आर्थिक क्षेत्रामध्ये एखादं धाडसही कराल. सुनियोजित गोष्टींमधून लाभ होण्याचा आजचा दिवस आहे.
मनामध्ये आशावाद आहे तर जगण्याला उमेद आहे. हे जाणवेल कुटुंबीयांमध्ये महत्त्वाचे जबाबदारीची उचलावी लागेल.
तब्येतीच्या आज काही तक्रारी राहतील असं वाटत नाही. दिवसांमध्ये कामाचे नियोजन चांगलं राहील .उत्साह व उमेद वाढवणाऱ्या घटना आज घडणार आहेत.