Success Story: सलग १० वेळा नापास, आईचे दागिने गहाण ठेवले; जिद्दीने क्रॅक केली UPSC; सिद्धार्थ सक्सेना यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of Siddharth Saxena: सिद्धार्थ सक्सेना यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आईने दागिनेदेखील विकले होते. मोठ्या जिद्दीने त्यांनी परीक्षा पास केली.
Success Story
Success StorySaam Tv
Published On
Summary

सिद्धार्थ सक्सेना यांचा प्रेरणादायी प्रवास

दहा वेळा अपयश तरी जिद्दीने क्रॅक केली UPSC

मुलाच्या शिक्षणासाठी आईचे विकले दागिने

प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही संघर्ष असतो. परंतु परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्यातून मार्ग काढता यायला हवा.सर्वात महत्त्वाचं म्हणजे किती अपयश आले तरी स्वतः वर असलेला विश्वास डगमगू द्यायचा नाही. सतत प्रयत्न करत राहिल्याने यश हे नक्कीच मिळते. असंच काहीसं सिद्धार्थ सक्सेना यांच्यासोबत झालं. आयुष्यात कितीही वेळा अपयश आले तरीही ते डगमगले नाही. सिद्धार्थी यांना सलग १० वेळा परीक्षेत अपयश आले होते तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी सतत प्रयत्न केले.

Success Story
Actress Success: 'या' अभिनेत्रीला दोन वेळचं जेवणही परवडत नव्हत; आज आहे इतक्या कोट्यवधी मालकीण

परिस्थितीवर मात करत यूपीएससी पास

सिद्धार्थ सक्सेना यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती. त्यांनी संपूर्ण परिस्थितीवर त्यांनी मात केली. त्यांनी वेळप्रसंगी आपल्या आईचे दागिनेदेखील विकले. परंतु सर्व प्रसंगावर मात करत UPSC CAPF परीक्षा पास केली. ते आता असिस्टंट कमांडंट म्हणून कार्यरत आहेत.

सिद्धार्थ सक्सेना यांचे शिक्षण

सिद्धार्थ सक्सेना हे उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यातील बीसलपुर येथील रहिवासी. त्यांचे वडील एका संस्थेत अकाउंटंट होतं. त्यांच्या वडिलांनी नेहमी त्यांना प्रेरित केले. सिद्धार्थ यांनी बीसलपुर येथील सरस्वती विद्या मंदिर इंटर कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना फिजिक्समध्ये पदवी मिळवली. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी मास्टर्स डिग्री प्राप्त केली. त्यांनी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्टदेखील पास केली. त्यांनी एलिमेंटट्री एज्युकेशनमध्ये डिप्लोमादेखील पूर्ण केला.

Success Story
Success Story : मुलासाठी आईने सरकारी नोकरी सोडली, चौथी फेल लेक झाला IRS अधिकारी, चौथ्या प्रयत्नात UPSC केली क्रॅक

२०२२ मध्ये सिद्धार्थ यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे लिव्हर खराब झाले होते. या काळात त्यांच्या वडिलांवर उपचार करण्यासाठी खूप पैसे खर्च झाले होते यामुळे खूप आर्थिक संकटातून जावे लागले. वडील गेल्यानंतरतही त्यांच्या आईने त्यांना सांभाळले. अभ्यासात आर्थिक अडचण येऊ नये म्हणून त्यांना दागिने विकले. परंतु लेकाने हे लक्षात ठेवून यूपीएससी परीक्षा पास केली.

Success Story
Success Story: चालताना अडचणी, नीट बोलता येत नव्हते, दिव्यांग असूनही क्रॅक केली UPSC; IRS मानवेंद्र सिंह यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com