Shruti Vilas Kadam
सामंथा रुथ प्रभूचे बालपण आर्थिक अडचणींमध्ये गेले. घरची परिस्थिती इतकी कठीण होती की “दोन वेळचे जेवण मिळणेही आव्हान” असे दिवस तिने पाहिले.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षात तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. या छोट्या कामामुळे तिचे शिक्षणाचे खर्च भागले आणि घरच्या आर्थिक भारातही काही कमी झाली.
२०१० साली तिला पहिला छोटा अभिनय रोल मिळाला. भूमिका लहान असली तरी तिने ती मनापासून केली. संधी कमी मिळत असतानाही तिने हार न मानता सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले.
२०१२ मध्ये तिला गंभीर इम्युनिटी डिसऑर्डर झाला. काही महिने तिला अभिनयापासून दूर राहावे लागले. पण तिने स्वतःला सावरलं, उपचार घेतले आणि नव्या ताकदीने पुन्हा कामात पडली.
साउथ चित्रपट, हिट OTT सिरिज आणि अनेक मोठ्या ब्रँड एन्डोर्समेंट्स या तिन्ही माध्यमांनी सामंथाला आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने खूप स्थिरता दिली. ती आज दक्षिणेतील सर्वाधिक मागणी असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
विविध मीडिया रिपोर्टनुसार सामंथाची सध्या एकूण संपत्ती सुमारे 101 कोटी इतकी असल्याचा अंदाज आहे. संघर्षातून आलेली ही प्रगती तिच्या मेहनतीची मोठी कहाणी सांगते.
पैशासाठी कोणतीही कामे न स्वीकारता, आरोग्य, विश्वास आणि वैयक्तिक मूल्य या आधारेच तिने अनेक ब्रँड डील्स नाकारल्या. त्यामुळे तिचा व्यक्तिमत्त्वातील आत्मसन्मान आणि धीर अधिकच अधोरेखित होतो.