Shruti Vilas Kadam
अवोकाडोमध्ये हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन E आणि C असतात. हे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते आणि फाइन लायन्स कमी करते.
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात, जे त्वचेची नैसर्गिक चमक वाढवतात आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.
ब्लूबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात मिळतात. हे त्वचेवरील वयाची चिन्हे कमी करून ग्लो देतात.
पालकमध्ये आयर्न, व्हिटॅमिन A आणि C प्रचंड प्रमाणात असतात. हे त्वचेच्या पेशींना दुरुस्त करतं आणि त्वचा तरुण ठेवतं.
एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलमध्ये हेल्दी फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे त्वचा टाईट आणि मॉइश्चराइज्ड राहते.
टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचा अँटिऑक्सिडंट असतो. हे सूर्यकिरणांमुळे होणारे नुकसान कमी करते आणि त्वचा मऊ ठेवते.
ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचा लवचिकपणा वाढवतात आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.