Shreya Maskar
दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.
शरीराच्या तंदुरुस्तीसाठी नियमित योगा करणे महत्वाचे आहे. यामुळे शरीर निरोगी राहते.
योगासने करण्यापूर्वी काही खाऊ नये. किमान खाल्ल्यावर २-३ तासांनी योगा करावा. अन्न खाल्ल्यानंतर योगा केल्यास मळमळ किंवा उलट्यांचा त्रास होऊ शकतो.
तुमच्या शरीराला एखादी इजा झाली असल्यास सहसा जखम भरे पर्यंत योगा करणे टाळा. नाहीतर शरीराला अजून नुकसान होऊ शकते.
योग करताना मोबाईल फोन दूर ठेवा. मोबाईलमुळे आपले लक्ष लवकर विचलित होते.
योगा करताना येणारा घाम वेळच्यावेळी पुसणे गरजेचे आहे. नाहीतर घाम शरीरात शोषल्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे नेहमी योगा करताना टॉवेल सोबत ठेवा.
अति उत्साहात योगा करणे टाळा. घाईघाईत केलेल्या चुकीची मुद्रा केल्यास शरीर अडचणीत येऊ शकते.
योगा करण्यापूर्वी १० ते १५ मिनिटांचा वॉर्मअप करा. त्यामुळे तुमचे शरीर योगासाठी तयार होईल.
योगा करण्यापूर्वी कधीही गरम पाण्याने आंघोळ करू नका. त्यामुळे शरीर ताठर बनते.
योगा करण्यापूर्वी चुकूनही कॅफिनचे सेवन करू नये. त्यामुळे अॅसिडिटी होऊ शकते. तसेच स्नायूंवर ताण वाढतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.