Thyroid Disease : थायरॉईड ठरतोय सायलेंट किलर, पुरुषांपेक्षा महिलांना करावा लागतो अधिक सामना; डॉक्टरांनी दिली सल्ला

Thyroid Silent Killer Disease : आपल्या गळ्यात असणार्‍या स्वरयंत्राच्या मागे एक फुलपाखरासारखी ग्रंथी म्हणजे थायरॉइड होय. थायरॉईड जागरूकता महिना पाळत असताना, थायरॉईड विकारांबाबत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करत असल्याने त्याला सायलेंट किलर म्हणूनही ओळखले जाते.
Thyroid Disease
Thyroid DiseaseSaam Tv
Published On

Thyroid Symptoms And Sign :

आपल्या गळ्यात असणार्‍या स्वरयंत्राच्या मागे एक फुलपाखरासारखी ग्रंथी म्हणजे थायरॉइड होय. थायरॉईड जागरूकता महिना पाळत असताना, थायरॉईड विकारांबाबत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करत असल्याने त्याला सायलेंट किलर म्हणूनही ओळखले जाते.

थायरॉईड ग्रंथी नाजूक फुलपाखरासारखी दिसत असली तरी शरीराची वाढ, मेंदूचे कार्य, प्रजनन संस्थेचे संतुलन आणि एकूणच चयापचयाच्या क्रियेचे नियमन ही अत्यंत महत्त्वाची कामे या थायरॉइड ग्रंथीच्या संप्रेरकाच्या कार्यावर परिणाम करतात.

लीलावती हॉस्पिटल मधुमेह (Diabetes) आणि एंडोक्राइनोलॉजिस्टचे डॉ विजय पणीकर म्हणतात की, 2021 मध्ये संपूर्ण भारतात झालेल्या सर्वेक्षणात, सुमारे 7.3 टक्के प्रतिसादकर्त्यांना थायरॉईडशी संबंधित समस्या होत्या. परंतु थायरॉईड विकार असलेले अंदाजे 50% लोक त्यांच्या या स्थितीबाबत अनभिज्ञ आहे. थायरॉईडच्या समस्यांमुळे एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण आरोग्यावर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर होणारा गंभीर परिणाम होतो.

1. लैंगिक विषमता: - एक लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे

थायरॉईड विकारांचा त्रास सहसा स्त्रियांना (Women) सहन करावा लागतो, पुरुषांपेक्षा पाच ते आठ पटीने या समस्यांना सामोरे जावे लागते.

Thyroid Disease
Constipation Causes : या चुकीच्या सवयींमुळे जडतो बद्धकोष्ठतेचा त्रास, चुकूनही दुर्लक्ष करु नका

2. धोक्याची चिन्हे ओळखणे:

चिन्हे आणि लक्षणांनी (Symptoms) थायरॉईड विकार वेगवेगळ्या प्रकारे आढळून येतात. हे पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही प्रभावित करतात. वजनातील चढ-उतार, मासिक पाळीच्या समस्या, वंध्यत्व, लैंगीक क्षमता कमी होणे, थकवा,ब्रेन फॅाग, नैराश्य आणि चिंता यासारखी लक्षणे आढळून येतात. ही धोक्याची चिन्हे दिसून येताच वैद्यकीय सल्ला घेणे योग्य राहिल.

3. नियमित तपासणी आणि चाचणीचे महत्त्व -

इतर आजारांच्या तपासणी प्रमाणेच थायरॉईड सारख्या आजाराची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. यामुळे थायरॉईड विकारांची प्रगती आणि त्यांच्या संभाव्य गुंतागुंतांना प्रतिबंधित करून वेळीच निदान केले जाते.

Thyroid Disease
Bone Cancer : हाडांचा कर्करोग कसा होतो? ५४ व्या वर्षीच्या व्यक्तीवर यशस्वीरित्या बोन मॅरो प्रत्यारोपण

4. योग्य जीवनशैलीची निवड:

चांगल्या आरोग्य सवयी तसेच योग्य जीवनशैलीची निवड थायरॉईड यंतुलन राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असा संतुलित आहार, नियमित व्यायाम, तणावाचे व्यवस्थापन आणि वजन नियंत्रित राखणे या सर्वांचा संपुर्ण आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान ठरते आणि थायरॉईड कार्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

5. मानसिक आरोग्य आणि थायरॉईड विकार

थायरॉईड ग्रंथीचे निदान न झालेल्या स्थितींमुळे अनेकदा नैराश्य आणि चिंता यासारख्या मानसिक आरोग्याच्या आव्हानांना सामोरे जावे लागते. यासाठी शारीरिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Thyroid Disease
Mahabaleshwar Travel Place : महाबळेश्वरला फिरायला जाताय? मॅप्रो गार्डनच नाही तर या पर्यटनस्थळांनाही द्या भेट

थायरॉईड विकार समजून घेणे आणि त्यावर उपाय करणे हे सर्वांगीण आरोग्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. जागरुकता वाढवणे, वेळीच निदानास प्रोत्साहन देणे, योग्य जीवनशैलीची निवड करणे यामुळे थायरॉईडसारख्या आजारास दूर ठेवता येते.थायरॉईड जागरूकता महिन्याच्या माध्यमातून या आजाराविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असून या आजाराच्या व्यवस्थापनाबाबत तसेच त्याची लक्षणे, कारणे, उपाय याविषयी देखील नागरिकांना जागरुक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com