Relationship Tips : ब्रेकअपनंतर रडत बसू नका; मुव्ह ऑनसाठी 'या' टिप्स ठरतील फायदेशीर

Move on Tips After Breakup : पार्टनरची फार जास्त आठवण येणे, जुन्या आठवणी सतत आठवणे, अशा गोष्टी त्या व्यक्तीसोबत घडत असतात. अशात पार्टनरला सोडल्यावरही त्याच्या आठवणी तुमचा पिछा सोडत नसतील तर या टिप्स ट्राय करा.
Move on Tips After Breakup
Relationship Tips Saam Tv
Published On

या दुनियेत दररोज अनेकांना आपलं प्रेम मिळतं. तर अनेकांचं प्रेम तुटतं. प्रेम मिळालं तरी ते शेवटपर्यंत ठिकवणे हे आपल्याच हातात असते. मात्र कितीही प्रेम असले तरी जर विचार मिळत नसतील तर त्या जोडप्यांचा घटस्फोट होतो. ज्या व्यक्तीवर भरपूर प्रेम केलेलं असतं त्याला विसरणे अनेकांसाठी कठीण आहे.

Move on Tips After Breakup
UP Breaking : अन् त्याने भाजप आमदाराच्या कानशिलात लगावली; पाहा व्हिडीओ

प्रेम विसरण्यासाठी त्या व्यक्तीला फार त्रास होतो. सतत रडणे, विचारांत राहणे, पार्टनरची फार जास्त आठवण येणे, जुन्या आठवणी सतत आठवणे, अशा गोष्टी त्या व्यक्तीसोबत घडत असतात. अशात पार्टनरला सोडल्यावरही त्याच्या आठवणी तुमचा पिछा सोडत नसतील तर या टिप्स ट्राय करा.

मित्रांसोबत जास्त वेळ राहा

जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर मित्रांसोबत राहण्यास सुरूवात करा. तुम्ही जास्तीत जास्त वेळ मित्रांसोबत घालवा. कारण नसताना विविध ठिकाणी फिरण्यासाठी जा. मित्र आपल्या आजुबाजूला असल्यास ते आपल्याला सतत हसवत राहतात. त्यांच्यासोबत असल्याने थोडं टेन्शन कमी झाल्याचं फिल होतं. त्यामुळे ब्रेकअपनतंर मित्रांसोबत जास्त वेळ घालवा.

फ्युचर गोलवर लक्ष द्या

तरुण मुलं-मुली कॉलेजमध्ये असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडतात.प्रेमात पडल्याने अनेकांचं अभ्यासावरचं लक्षही उडतं. अता तुम्ही देखील कॉलेजमध्य आहात आणि तुमचं ब्रेकअप झालं आहे, तर सर्वात आधी अभ्यासाला जास्त वेळ द्या. तुमचं शेवटचं ध्येय काय आहे ते आठवा. तसेच यानुसार काम करण्यास सुरुवात करा.

स्वत:ची काळजी घ्या

अनेकदा नात्यात दुरावा आल्यावर व्यक्ती जेवण करत नाहीत, उपाशी राहतात. सतत उपाशी पाहिल्याने विकनेस येतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने कोणताही आजार आपल्याला सहज होऊ शकतो. त्यामुळे अशावेळी आपल्या आरोग्याकडे स्वत:च जास्तीत जास्त लक्ष द्या. ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून गेली असं म्हणत सेलिब्रेशन करा.

Move on Tips After Breakup
Break Up नंतर पार्टनर पुन्हा आलाय? या ५ लक्षणांवरुन कळेल तुमच्या नात्यातील अंतर...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com