Break Up नंतर पार्टनर पुन्हा आलाय? या ५ लक्षणांवरुन कळेल तुमच्या नात्यातील अंतर...

Relationship Advice : बरेचदा ब्रेकअप झाल्यानंतर तो किंवा ती दोघांपैकी कुणीतरी एक पुन्हा माघारी फिरतो. परंतु, त्यामुळे समोरच्या व्यक्तीला मानसिक रित्या अधिक जास्त ताण सहन करावा लागतो. तुमचा पार्टनर पुन्हा आल्याने तो खरेच आपल्याशी प्रमाणिक आहे का? तुमच्या आयुष्यात पुन्हा संधी द्यावी का?
Relationship Advice
Relationship AdviceSaam tv
Published On

Relationship Tips :

नातं म्हटलं की, त्यात रुसवे फुगवे आलेच. परंतु, नात्यात दूरावा आल्यानंतर अनेकजणांचा शेवटचा पर्याय असतो वेगळे होणे. हल्ली प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरुन तुमच्या नात्यात दूरावा निर्माण होत असेल तर नात्यात प्रेम आणि विश्वास वाढवण्याची गरज आहे.

बरेचदा ब्रेकअप झाल्यानंतर तो किंवा ती दोघांपैकी कुणीतरी एक पुन्हा माघारी फिरतो. परंतु, त्यामुळे समोरच्या व्यक्तीला मानसिक रित्या अधिक जास्त ताण सहन करावा लागतो. तुमचा पार्टनर पुन्हा आल्याने तो खरेच आपल्याशी प्रमाणिक आहे का? तुमच्या आयुष्यात पुन्हा संधी द्यावी का? असे एक नी अनेक प्रश्न मनात उभे राहातात. आम्ही तुम्हाला अशाच काही ५ लक्षणांबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्हाला कळेल की, तुमचे नाते चुकीचे आहे की, बरोबर जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

1. छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालणे

तुम्ही चुकीच्या नात्यात (Relationship) असला तर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर वाद होतीलच. त्यावरुन कळेल तुमचे नाते किती परफेक्ट आहे. केलेल्या चुका पुन्हा करत असतील तर त्याच वेळी थांबणे गरजेचे आहे.

Relationship Advice
Relationship Tips : पुरुषांच्या या ५ सवयींवर महिला होतात नेहमी नाराज, नात्यात येतो दूरावा

2. भावनिकदृष्ट्या कमकुवत

बरेचदा नात्यात जोडीदार (Partner) हा अधिक भावनिक असतो. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरुन समोरच्याचे अश्रू कोसळतात. ही गोष्ट सामान्य वाटत असली तरी अनेकदा याचा नात्यावर परिणाम होतो. यामुळे नात्यात दूरावा येतो.

3. दुसऱ्या सतत गृहित धरणे

जोडीदाराच्या आनंदासाठी आपण अनेक अशा गोष्टी करतो ज्याचा आपल्या मानसिकतेवर परिणाम होतो. ज्यामुळे आपली विचार करण्याची क्षमता संपते. त्यामुळे समोरच्या पार्टनरला वेगळे होण्याची इच्छा होते.

Relationship Advice
New Year 2024 Astrology : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात आणा या वस्तू, कधीच भासणार नाही पैशांची चणचण

4. भावनिक भीती

नात्यात अनेकदा एकमेकांना गमवण्याची भीती अधिक वाटू लागते. चुकीच्या नात्याची ही पहिली पायरी आहे. त्यामुळे तुमचा पार्टनर सतत एकटे सोडत नाही, वारंवार तुम्ही कुठे आहात याची चौकशी करणे, फोन करुन त्रास देण्यासारथे अनेक चुकीची पाऊले उचलतात. चांगल्या नातेसंबंधात अनेक लोक आनंदी असतात. त्यांना एकमेकांपासून वेगळे होण्याची भीती किंवा चिंता नसते.

5. आरोग्यावर वाईट परिणाम

तुम्ही नात्यात आनंदी नसाल तर तुम्हाला दररोज कोणत्या ना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर (Health) देखील परिणाम होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com